Tuesday, November 24, 2026
Homeक्राईमShrirampur : श्रीरामपूर, श्रीगोंद्यात अवैध धंद्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचे छापे

Shrirampur : श्रीरामपूर, श्रीगोंद्यात अवैध धंद्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचे छापे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम राबवत श्रीरामपूर तालुका, श्रीरामपूर शहर आणि श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापे टाकले. या कारवाईत अवैध दारूविक्री व जुगारप्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकूण 1 लाख 24 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी दोन पथके तयार करून जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार 30 ऑक्टोबर रोजी या पथकांनी विविध ठिकाणी छापे टाकून ही कारवाई केली.

- Advertisement -

पहिली कारवाई श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माळवडगाव येथे करण्यात आली. यावेळी संजय खताळ (रा.माळवडगाव, ता.श्रीरामपूर) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत 8 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसरी कारवाई श्रीरामपूर शहरातील वॉर्ड क्रमांक 4 मध्ये करण्यात आली. येथे जुगारप्रकरणी अजिज शेख (वय 26), अभिजीत गिरी (वय 36) आणि रविंद्र चव्हाण (फरार) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत 80 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तिसरी कारवाई श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंढेकरवाडी येथे करण्यात आली. यामध्ये कृष्णा मुंढेकर (रा. मुंढेकरवाडी, ता.श्रीगोंदा) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (अ), (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत 36 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये तसेच पोलीस अंमलदार अशोक लिपणे, अजिनाथ पाखरे, किशोर शिरसाठ, रमीजराजा आत्तार, विशाल तनपुरे, गणेश धोत्रे, गणेश लबडे, श्यामसुंदर जाधव, दीपक जाधव, मनोज साखरे, रोहित मिसाळ, रोहित येमुल आणि प्रताप देवकाते यांच्या पथकाने केली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ऊसदरावर निर्णय न झाल्यास शनिवारी रेलरोको-रास्तारोको

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या ऊसाला राज्यातील अन्य जिल्ह्याप्रमाणे भाव मिळावा, या मागणीसाठी 26 तारखेला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत...