Tuesday, September 8, 2026
HomeनगरShrirampur : श्रीरामपूर तालुक्याच्या काही भागात वादळी वार्‍यासह पावसाची हजेरी

Shrirampur : श्रीरामपूर तालुक्याच्या काही भागात वादळी वार्‍यासह पावसाची हजेरी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्याच्या काही भागात वादळी वार्‍यासह (Stormy Winds) अवकाळी पावसाने हजेरी लावली. खैरी निमगाव, हरेगाव, नाऊरचा काही भाग, माळवाडगाव, मुठेवाडगाव आदी परिसरात या पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली. सुमारे अर्धातास चालेल्या या पावसाने काही वेळातच पाणीचपाणी केले होते.

- Advertisement -

आज सायंकाळी वादळी वार्‍यासह पावसाला सुरवात झाली. वादळी वार्‍यासह अर्धातास अचानक पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांची दाणादाण उडाली. खैरी-निमगाव परिसरात काही भागात मुरघासासाठी मकाची कुट्टी सुरु होती. त्याचे अचानक आलेल्या या पावसामुळे नुकसान झाल्याचे समजते. अचानक पडलेल्या पावसाने (Unseasonal Rain) वातावरणात गारवा निर्माण झाला होता. हरेगाव, महांकाळवाडगाव, माळवाडगाव, मुठेवाडगाव आदी भगात जोरदार तर वडाळा महादेव, खोकर, भोकर यया परिसरात पावसाचा शिडकाव झाला.

किरकोळ पाऊस आला तरी भोकर परिसरात वीज पुरवठा खंडीत होणे हे नित्याचेच झाले आहे. आज सायंकाळी भोकर-खोकर परिसरात पावसाचा किरकोळ शिडकाव झाला. परंतू लगेचच वीज पुरवठा खंडीत झाला होता. वारंवार होणार्‍या या प्रकारामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : गावगाडा आता कुणाच्या हाती?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने जिल्ह्यातील 753 ग्रामपंचायतींच्या कारभाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. निवडणुका होईपर्यंत गावांचा कारभार सुरळीत चालावा, यासाठी नियुक्त करण्यात...