Saturday, April 26, 2025
Homeनगरश्रीरामपुरात बोगस नळ कनेक्शनचे प्रमाण वाढले

श्रीरामपुरात बोगस नळ कनेक्शनचे प्रमाण वाढले

पालिकेने शोध मोहीम राबविण्याची मागणी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

एकीकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही नळ कनेक्शन नागरिकांना मिळत नाही. दुसरीकडे पाणीपुरवठा विभागातील काही अधिकारी व कर्मचारी यांना हाताशी धरून बोगस नळ कनेक्शन जोडून देण्याचे प्रमाण शहरामध्ये वाढले आहे. त्यामुळे पाणीपट्टी भरणार्‍या नागरिकांनी देखील आता आमची पाणीपट्टी माफ करा, अशी मागणी केली आहे. शहराच्या विविध भागांमध्ये बोगस नळ कनेक्शन जोडून घेण्याचे काम जोरात सुरू आहे. या कामात नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे काही अधिकारी व कर्मचारी देखील सामील आहेत. या कर्मचार्‍यांना हाताशी धरून बिगर कागदपत्रांचे कोणतीही मंजुरी न घेता नळ कनेक्शन जोडून देण्यात येत आहेत.

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वी वॉर्ड नं. 2 मध्ये नुकताच तयार झालेला पेव्हिंग ब्लॉकचा नवीन रस्ता खोदून एक पाईपलाईन टाकण्यात आली. या पाईपलाईनवरून आपल्या जवळच्या लोकांना बिगर कागदपत्रांचे कनेक्शन जोडून देण्यात आले. इतर लोकांनी मागणी केली असता त्यांना नियम दाखवण्यात आला. विशेष म्हणजे ज्या लोकांकडे आधीचे कनेक्शन आहे. त्यांना या नवीन लाईनवरून फुकटचे कनेक्शन देण्यात आले आहे. त्यामुळे या लोकांनी आता पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांकडे याबाबत तक्रार केली असून नळ कनेक्शन देण्यास आमचा कोणताही विरोध नाही. मात्र, काही लोकांना जर ते फुकट मिळणार असेल तर आम्हालाही मोफत दिले जावे. नियमानुसार सर्व कागदपत्रांची पूर्तता करून कनेक्शन द्यावे व यापूर्वी ज्यांनी बोगस नळ कनेक्शन घेतले आहे, अशा सर्व नळ कनेक्शन धारकांना दंड आकारणी करून त्यांना नियमित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

शहरामध्ये काही माजी नगरसेवकांचे नगरपालिकेमध्ये मोठे वजन आहे. त्याचा गैरफायदा घेऊन त्या नगरसेवकांच्या नावाखाली इतर लोक फायदे घेत असल्याचे सर्रास दिसून येत आहे. मात्र, नगरपालिका या बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याने इमानदारीने नळपट्टी भरणार्‍या लोकांवर अन्याय होत आहे. नगरपालिका जर बोगस नळ कनेक्शनला प्रोत्साहन देणार असेल तर शहरातील सर्वच नळ कनेक्शन धारकांची नळपट्टी माफ करण्यात यावी, अशी मागणी जनतेतून करण्यात आली आहे. नगरपालिकेचे काही कर्मचारी रात्री नळ कनेक्शन जोडण्याचे काम करतात तसेच काही अधिकारी याबाबत प्रोत्साहन देत असल्याने या सर्वांवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २६ एप्रिल २०२५ – मैत्रीतील मंदी परवडणारी नाही

0
मैत्रीचे नाते सर्वांना कायमच भुरळ घालते. तिचे वर्णन करताना साहित्यिकांच्या शब्दांना धुमारे फुटतात. कवींना कविता स्फुरतात. जिवलग मित्रांच्या भेटीच्या अनेक कथा, गोष्टी आणि कविता...