मुंबई | Mumbai
जगभरातील गणेशभक्तांचे आराध्य दैवत बनलेल्या मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी रोज हजारो भाविक येत असतात. मुंबईसोबत देशाविदेशातून गणरायाच्या दर्शनासाठी येथे येत असतात. त्यामुळे मंदिरात कायमच भाविकांची गर्दी असते. भाविकांना पावणारा गणराया म्हणून सिद्धिविनायक मंदिराची ख्याती आहे. त्यातच आता ड्रेस कोड संदर्भात सिद्धीविनायक मंदिर न्यासाने या संदर्भात अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले आहे.
देशविदेशातील गणेशभक्तांचे अराध्य दैवत असलेल्या मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरात आता ड्रेस कोड लागू करण्यात आलाय. सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टने या संदर्भात अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले आहे. नागरिकांना संकोच वाटणार नाही असे कपडे भाविकांनी परिधान करावे. सिद्धीविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांनी आता भारतीय पारंपारिक वेशभूषा किंवा अंगभर कपडे घातले पाहिजे तरच त्यांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार असल्याचे पत्र मंदिर न्यासाकडून प्रसिद्ध करण्यात आलेय.
काय आहे नियमावली?
सिध्दीविनायक मंदिर हे पवित्र स्थान असल्याने त्याचं पावित्र्य भाविकांनी राखावे.
अंगप्रदर्शन करणारे, तोकडे कपडे घालणारे भाविक मंदिरात प्रवेश करु नये.
मंदिरात अशोभनिय कपडे घालणे टाळावे, भारतीय परंपरेला साजेशा कपड्यांचा समावेश असावा असे ही म्हंटले आहे.
देशभरातील अनेक मोठ्या मंदिरांमध्ये आधीच वस्त्र संहिता आहे. काही कोणी मंदिरात अशोभनीय, तोकडे कपडे घालून आले तर त्याला परत पाठवण्याऐवजी मंदिराच्या प्रवेशद्वारावर शॉल, ओढणी, धोतर असे कपडे देण्यात येते. भाविकाला ते वापरून पांघरून मंदिरात जाता येते.
दरम्यान, यापूर्वी महाराष्ट्रातील अनेक मंदिरांमध्ये ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाने याबाबत एक प्रसिध्दीपरिपत्रक प्रसिध्द केले आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर, रत्नागिरीतील ५० मंदिरे, जळगाव, अकोला, धुळे, नाशिक, नागपूर, अमरावती, अहिल्यानगर या जिल्ह्यातील मंदिरांचा समावेश आहे. मुंबई, पालघर, रायगड, ठाणे जिल्ह्यातील मंदिरांचा समावेश आहे. नागपूरच्या संकटमोचन पंचमुखी हनुमान मंदिर, श्री बृहस्पती मंदिर, गोपाळकृष्ण मंदिर, दुर्गामाता मंदिर, आदींमध्ये ड्रेसकोड लागू करण्यात आले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा