नाशिक | Nashik
सिंहस्थ आपल्या सर्वांचा अभिमान आहे. हा सोहळा यशस्वी झाला तर त्याचा फायदा फक्त भाविकांना नाही, तर पुढील अनेक दशकांपर्यंत नाशिककरांना होईल. पायाभूत सुविधा, स्वच्छता, पर्यटन, आर्थिक विकास हे सगळे वानिमित्ताने पुढे जाईल, सिंहस्थ २०२७-२८ हा नाशिकच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, हा सोहळा अविस्मरणीय ठरेल. शहराचा चेहरामोहरा बदलेल आणि नाशिकचे (Nashik) नाव जागतिक पातळीवर नवे स्थान मिळवेल, हा सोहळा घडवताना आमचे ध्येय स्पष्ट आहे. सिंहस्थ केवळ धार्मिक महोत्सव नाही, तर नाशिकच्या विकासाचा महामहोत्सव आहे. सिंहस्थ हा नाशिकचा वारसा आहे आणि आपण सर्वांनी मिळून हा वारसा समृद्ध करायचा आहे.
सिंहस्थ हा नाशिकसाठी (Nashik) खऱ्या अर्थाने विकासाचा महामहोत्सव ठरतो. दर बारा वर्षांनी होणारा सिंहस्थ केवळ धार्मिक सोहळा नसून शहरासाठी संपूर्ण विकासाचा रोडमॅप असतो. सिंहस्थात कोट्यवधी भाविक येथे येतात, त्यांच्या आठवणी, त्यांच्या अनुभूती नाशिकला एका वेगळ्या उसीजर नेऊन ठेवतात. म्हणूनच सिंहस्थ हा नाशिकचा ”ब्रॅण्ड ॲम्बेसेडर” आहे, असे नाशिक महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री (Manisha Khatri) यांनी ‘देशदूत’शी संवाद साधताना सांगितले.
नाशिक महानगर इतिहास, धर्म आणि परंपरा अशा त्रिसूत्रीने बांधलेले आहे. प्रभू श्रीरामचंद्रांनी येथे वास्तव्य केले. गोदामाईने या शहरास आशीर्वाद दिला आणि रामकथेत नाशिकला ते स्थान मिळाले, तेच या शहराचे शाश्वत वैभव आहे. काळ बदलत गेला, पण नाशिकची ही आध्यात्मिक ओळख अजूनही कायम आहे. आधुनिक काळात ‘वाईन सिटी’ म्हणून नाशिकने घेतलेली झेपसुद्धा कौतुकास्पद आहे. एकीकडे आध्यात्मिक राजधानी आणि दुसरीकडे द्राक्षांचा वाईन उद्योग हे दोन टोकाचे परंतु तितकेच महत्वाचे चेहरे एकाच शहराला लाभले आहेत. नाशिकमध्ये २०२७-२८ मध्ये होणाऱ्या सिंहस्थाची तयारी मनपा प्रशासनाने पूर्वीच सुरु केली आहे. प्रयागराज येथे अभ्यास दौरा करण्यात आला. तेथील अनेक कामांचा अभ्यास करून त्याचा उपयोग नाशिकमध्ये केला जात आहे. महापालिकेकडून स्वतंत्र विकास आराखडा शासनाला देण्यात आला. या आराखड्यात शहराच्या भविष्यातील गरजांनुसार मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेण्यात आली आहेत. हा आराखडा फक्त धार्मिक सोहळयापुरता मर्यादित नसून उद्योग, पर्यटन, हॉस्पिटलिटी, कृषी, वाहतूक अशा सर्व क्षेत्रांना गती देणारा ठरणार आहे. नाशिक महानगर हे मुंबई-पुणे-नाशिक मा सुवर्ण त्रिकोणातील महत्वाचे केंद्र आहे. या त्रिकोणात नाशिकचा विकास सिंहस्थामुळे सर्वाधिक झाला आहे. कारण प्रत्येक सिंहस्थात एकप्रकारे १२ वर्षांचा विकासाचा अनुशेष (बॅकलॉग) भरून निघतो, रस्ते, फूल, मलस्त शुद्धीकरण, पाणीपुरवठा वाहतूक, पर्यटन क्षेत्रात सिंहस्थामुळेच शहरात झपाट्याने बदल होतो, असे आयुक्त खत्री यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राधान्यक्रमाने कामे सुचवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार मनपाने प्रयागराज दौरा केला, तेथील पायाभूत सुविधा, व्यवस्थापन पद्धती, गदीं नियंत्रणाचे उपाय, पर्यटन उपक्रम पाहिले. त्यातील उपयुक्त बाबी नाशिकसाठी आत्मखत करण्याचा प्रषत्प केला वावा आधारित सुधारित आराखडा शासनाला सादर केला आहे. सिंहस्थाच्या तयारीत शहरात अनेक मोठी कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यात प्रमुख्याने अंतर्गत बाह्य रिंगरोडचे जाळे आहे. शहरातील वाहतूककोंडी टाळण्यासाठी रिंगरोड हा अत्यावश्यक प्रकल्प आहे. यामुळे भाविकांना प्रवास सुलभ होईल, तसेच दीर्घकालीन दृष्टीने शहराच्या वाहतुकीला गती मिळेल. गोदावरी नदी ही नाशिकची जीवनरेखा आहे. भाविकांची आस्था या नदीशी निगडीत आहे. त्यामुळे नदीकाठ स्वच्छ, सुंदर व आकर्षक करण्यावर भर आहे. घाटांचा विकास, स्वच्छता आणि सुशोभीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. मलजल शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) पर्यावरणपूरक दृष्टीने अत्यंत महत्वाचे काम आहे. शहरातील सांडपाणी शुद्ध होऊन गोदेत जाणापूर्वी त्याची प्रक्रिया व्हावी, यासाठी नवे एसटीपी उभारले जात आहेत. तसेच नवीन पूल चकचकीत रस्ते करण्यात येत आहेत.
नाशिकला सिंहस्थात लाखो भाविक येणार आहेत. यामुळे पूल व रस्त्यांवर प्रचंड ताण येतो, नवीन पूल, उड्डाणपूल व रस्ते बांधून वाहतुकीची सुलभता सुनिश्चित केली जाणार आहे. भूसंपादन नवीन विकास प्रकल्पामुळे शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे. मोठ्या प्रमाणावर भूसंपादन केले जाणार आहे. महापालिका शहरातील सहाही विभागांत २५ कि.मी. ४९ ठिकाणी मलवाहिन्या टाकणार आहे. यासाठी २२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर शहरातील स्वच्छतेची पातळी लक्षणीयरीत्या उंचावेल, वाहनतळ आणि वाहन व्यवस्थापन ही सिंहस्थातील आणखी एक मोठी समस्या असते. लाखो भाविक एकाच वेळी सात येतात, तेव्हा वाहनांची प्रचंड गरज भासते. यासाठी आम्ही सात नवे वाहनतळ विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. यात समावेशक आरक्षणाअंतर्गत विकसित झालेल्या चार, गोदावरी नदीकाठावरील दोन व भालेकर हायस्कूलजवळील एक असे वाहनतळ असतील, स्मार्टसिटी कंपनीने ‘पीपीपी’ तत्त्वावर उभारलेल्या ३३ ठिकाणी वाहनतळ व्यवस्थापन केले जाणार आहे. गर्दी व्यवस्थापन ही सिंहस्थाची खरी कसोटी आहे. लाखो भाविकांचा प्रवाह थांबवणे शक्य नाही. उलट त्यांना सुरळीत दिशा देणे आवश्यक आहे. आम्ही यावेळी वाहतुकीचे वैज्ञानिक नियोजन केले आहे. प्रवेश व निर्गमन मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीसाठी स्वतंत्र आराखडा तयार केला आहे. त्याचप्रमाणे डिजिटल फलक, मोबाईल अॅप्स, ऑनलाईन माहिती केंद्रे या सर्वांच्या सहाय्याने भाविकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. सिंहस्थ केवळ धार्मिक सोहळा बसून तो सांस्कृतिक महोत्सवही आहे. भाविकांना अविस्मरणीय अनुभव मिळावा म्हणून मनोरंजन पार्क संगीत कारंजे, ध्वनिप्रकाश कार्यक्रम अशा सुविधा उभारल्या जाणार आहेत. या सर्व उपक्रमांमुळे नाशिकचा पर्यटन विकास अधिक वेगाने होईल.
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक मनपाच्या आरोग्य विभागाने सिंहस्थात येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याच्या दुष्टीने व्यापक नियोजन केले आहे. याअंतर्गत तपोवनातील मैदानात शंभर घाटांचा उपयोगासाठी स्वतंत्र सात्पुरता दवाखाना उभारण्यात येणार आहे. या दवाखान्यांची उभारणी भाविकांची संख्या, संभाव्य आपत्कालीन परिस्थिती आणि संसर्गजन्य रोग नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाने यासाठी आवश्यक त्या सुविधा, औषधे, डॉक्टर व परिचारिका यांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या दवाखान्यात आपत्कालीन सेवा, प्राथमिक उपचार, आयसोलेशन कक्ष तसेच रुग्णवाहिकांचीही सुविधा उपलब्ध असणार आहे. गरज पडल्यास रुग्णांना तत्काळ जिल्हा रूग्णालयात किंवा खासगी रुग्णालयात हलवण्याचीही व्यवस्था करण्यात येईल. नाशिक मनपाच्या आरोग्य विभागाला सिंहस्थात विविध आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी सुमारे ८३ कोटी रुपयांची गरज लागणार आहे. तशी मागणी प्राधिकरणाकडे करण्यात आली आहे.
दरम्यान, शहरातील काही खासगी दवाखान्यांसह मनपाचे नाशिकरोड येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बिटको रूग्णालया तसेच मनपाच्या जुने नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात रुग्णांसाठी खाटा राखीव ठेवण्यात येणार आहेत. मनपाला तात्पुरत्या स्वरुपात सुमारे १.००९ डॉक्टरांसह आरोग्य विभाग कर्मचारी लागतील, त्यांची तात्पुरती भरती केली जाणार आहे. त्यात एमबीबीएस दर्जाचे ६३ तर स्पेशल डॉक्टर लागतील. नाशिकच्या सिंहस्थात होणाऱ्या गदर्दीत एखाद्या भाविकाला आरोग्याचा त्रास झाला तर त्याला त्वरित मदत करण्यासाठी बाईकअॅम्ब्युलन्स तयार करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे पाच बाईक अॅम्ब्युलन्स तयार करण्यात येणार आहेत. भाविकांना तत्काळ व गर्दीच्या ठिकाणी आरोग्य सुविधा मिळावी यासाठी ही योजना अंमलात आणली जाईल, असे खत्री यांनी सांगितले.
सिंहस्थामुळे आर्थिकदृष्ट्याही मोठा बदल होणार आहे. शहरातील हॉटेल व्यवसाय, वाहतूक टैक्सी, व्यापारी, शेतकरी, पर्यटन उद्योग या सगळ्यांना या सोहळ्यामुळे नवी बाजारपेठ मिळते. हजारो लोकांना रोजगार उपलब्ध होतो. कृषी उत्पादनांना बेट विक्रीची संधी मिळते उद्योग धंद्यांना चालना मिळते. आगामी सिंहस्थात भाविकांच्या सुरक्षेसाठी तसेच कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीकडून शहरात ५,३०० कायमस्वरूपी सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. तसेच सिंहस्थकाळात शहरात येणाच्या भाविकांचीअचूक गणना करण्यासाठी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने संशयित व गुन्हेगार शोधण्यासाठी राशिक मनपा, स्मार्ट सिटी कंपनी आणि शहर पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने अत्याधुनिक आय तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. उक्रमामुळे लाखो भाविकांच्या गर्दीतून या व्यक्तीला काही मिनिटांत शोधणेही शरम होणार आहे. नाशिकच्या सात किती भाविक देऊन गेले? याची अचूक माहिती या तंत्रज्ञानामुळे मिळणार आहे. २०१५ च्या सिंहस्थात फूटप्रिंट घेण्याचे यंत्र लावण्यात आले होती. आता पहिल्यांदाच एआय संज्ञाराचा वापर करून कॅमेऱ्यात संख्या मिळणार आहे. दर सिंहस्थात नाशिक महानगरात देश-विदेशातून लाखो भाविकांचा ओघ असतो. यामुळे अचूक गदींचा अंदाज घेणे, वाहतूक नियंत्रण, आरोग्य सुविधा तसेच सुरक्षेची आखणी करणे ही मोठी जबाबदारी असते, यावेळी ही जबाबदारी अधिक अचूकपणे पार पाडण्यासाठी एआय आधारित सीसीटीव्ही प्रणाली कार्यरत केली जाणार आहे. शहरातील महत्त्वाच्या चौकांवर, घाट परिसरात, प्रमुख रस्त्यांवर , बसस्थानक, रेल्वे स्टेशन आणि प्रवेशद्वारांवर विशेष एआय सक्षम कॅमेरे बसवले जाणार आहेत. विशेष करून पंचवटी व रामकुंड या तिकाणी हे एआय तंत्रज्ञानाचे सीसीटीव्ही कॅमरे लावण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्यांच्या मदतीने भाविकांची सतत गणना होईल. एआय प्रणाली गर्दीतील प्रत्येक व्यक्तीची उपस्थिती ओळखून रिअल टाईम डेटा तयार करेल. या आकडेवारीआधारे मनपा आणि पोलीस प्रशासनाला गर्दीचे नियोजन सोपे होईल. कुठे गर्दी वाढली? कुठे कमी झाली? कोणते रस्ते मोकळे आहेत? याची माहिती लगेच उपलब्ध होणार आहे. सिंहस्थासारख्या धार्मिक सोहळ्यात लाखो लोकांची उपस्थिती ही सुरक्षेच्या दृष्टीने आव्हानात्मक असते. संशयित, फरारी गुन्हेगार, हरवलेली व्यक्ती अशा प्रकरणांत पारंपरिक पद्धतीने शोध घेणे वेळखाऊ आणि अवघड असते. मात्र यावेळी एआय तंत्रज्ञानामुळे ही प्रक्रिया काही मिनिटांत पूर्ण होऊ शकेल. यासाठी एखाद्या व्यक्तीवा फोटो किया जुनी इमेज असेल तर तीएआय प्रणालीत अपलोड केली जाईल. एआय त्या इमेजला डिजिटल कोड (बारकोडसारख्या स्वरुपात) मध्ये रूपांतरित करून सीसीटीव्ही कंपन्यांच्या मेट व्हिडिओ फिडमध्ये त्या चेहऱ्याचा शोध घेईल. यातून त्या व्यक्तीचा चेहरा ओळखताना त्याचे अचूक स्थान नकाशावर दिसेल आणि काही सेकंदांत पोलिसांना सूचना मिळेल. सिंहस्थात दरवेळी मोठ्या प्रमाणावर हरवलेल्या व्यक्तींची प्रकरणे घड़तात. लहान मुले, वृद्ध व्यक्ती, मानसिकदृष्टया अस्वस्थ असणारे भाविक यांना त्यांच्या कुटुंबियांशी पुन्हा जोडणे ही मोठी सामाजिक गरज असते.
एआय तंत्रज्ञानामुळे अशा व्यक्तींना शोधणे जलद आणि सोपे होईल. फक्त त्यांचा फोटो प्रणालीत टाकता की काही मिनिटांत तो गर्दीत कुठे आहे याचा तपास लागेल, वा संपूर्ण प्रकल्पासाठी नाशिक मनपा, नाशिक स्मार्ट सिटी आणि शहर पोलीस यांच्यात समन्वय साधला आहे. स्मार्ट सिटीच्या निधीतून अत्याधुनिक एआय कॅमेरे, सही आणि डेटा विश्लेषण प्रणाली उभारली जाईल. मनपा त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देईल. पोलिसांकडून सुरक्षा नियंत्रण व कार्यवाही केली जाईल, एआय तंत्रज्ञानाचा वापर करताना नागरिकांच्या गोपनीयतेचा भंग होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाईल. मिळालेला डेटा केवळ सुरक्षा व गर्दी व्यवस्थापनासाठीच वापरला जाईल. प्रशासन एकटे काहीच करू शकत नाही. नागरिक, स्वयंसेवी संस्था, व्यापारी, हॉटेल व्यवसायिक, वाहतूकदार या सर्वांच्या सहकार्याशिवाय सिंहस्थ यशस्वी करणे शक्य नाही. हा सोहळा यशस्वी झाला तर त्याचा फायदा फक्त भाविकांना नाही तर पुढील अनेक दशकांपर्यंत नाशिककरांना होईल, सिंहस्थ २०२७-२८ हा नाशिकच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. शहराचा चेहरामोहरा बदलेल आणि नाशिकचे नाव जागतिक पातळीवर नवे स्थान मिळवेल. सिंहस्थ केवळ धार्मिक महोत्सव नाही, तर नाशिकच्या विकासाचा महामहोत्सव आहे. नाशिककरांचा सहभाग, शासनाचे सहकार्य आणि भाविकांच्या उपलब्ध श्रद्धेच्या उर्जेने हा सोहळा यशस्वी करू, असा ठाम विश्वास आयुक्त खत्री यांनी व्यक्त केला.
स्वच्छ सिंहस्थ, सुरक्षित सिंहस्थ…
सिंहस्थासारख्या अतिशय विशाल सोहळ्यात आरोग्य आणि स्वच्छता राखण्याचे फार मोठे आव्हान नाशिक मनपासमोर आहे भाविकांची सोय व स्वच्छतेला विशेष महत्व देऊन घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून पायाभूत सुविधांची उभारणी युद्धपातळीवर केली जात आहे. पंचवटी, तपोवन तसेच शहरातील प्रमुख रस्ते, वाहनतळ परिसर व घाट आदी भागात तब्बल १० हजार तात्पुरती स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत. भाविकांसाठी दर १० मीटरवर एक स्वच्छतागृह ठेवण्याचे नियोजनही करण्यात येत आहे. प्रयागराज येथे कुंभमेळा पार पडला तेथील यशस्वी नियोजन, विशेषतः स्वच्छता व मलनिस्सारण व्यवस्थापनाची मॉडेल्सा, नाशिक मनपाने अभ्यासली आहेत. तेथील अनुभवाआधारे नाशिकमध्ये नियोजन करण्यात येत आहे. स्वच्छ सिंहस्थ, सुरक्षित सिंहस्थ हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून अधिकाधिक तात्पुरती स्वच्छतागृहे, मोबाइल टॉयलेट्स, कचरा संकलन गाड्या, दौरा बेसिन युनिट्स उभारण्यात येणार आहेत. दिव्यांग भाविकांसाठी सुलभ शौचालयांची व्यवस्था केली जाणार आहे. स्वच्छतेचे नियोजन केवळ तात्पुरत्या संरचनेवर यार्दीत राहणार नाही. यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. एकप्रकारे स्वच्छतागृह युनिटच्या देखरेखीसाठी स्वयंसेवक व कंत्राटी कर्मचारी नेमले जातील मोबाइल अॅप व कंट्रोल कमद्वारे स्वच्छतागृहांची स्थिती, स्वच्छतेची वेळ व कचरा संकलनाची नोंद ठेवली जाईल कचरा तत्काळ उचलण्यासाठी विशेष रिअल टाईम मॉनिटरिंग सिस्टम बसवण्यात येईल याशिवाय, पाणी बचत करणारे आधुनिक यूरिनल्ला, सेप्टिक टैंक व मलनिस्सारण ट्रिटमेंट यंत्रणाही उभारण्यात येणार आहे. प्रत्येक स्वच्छतागृह परिसरात सॅनिटायझेशन व औषध फवारणी केली जाणार आहे.
मुद्दे
- नाशिकचा सर्वाधिक विकास सिंहस्थामुळे झाला आहे. कारण प्रत्येक सिंहस्थात एकप्रकारे १२ वर्षाचा विकासाचा अनुशेष भरून निघतो.
- सिंहस्थासाठी अंतर्गत व बाह्य रिगरोडचे जाळे तयार करण्यात येत आहे. वाहतूककोंडी टाळण्यासाठी रिंगरोड हा आवश्यक प्रकल्प आहे.
- गोदावरी नदी ही ‘नाशिकची जीवनरेखा आहे भाविकांची आस्था वा नदीही निगडीत आहे त्यामुळे नदीकाठ स्वच्छ, सुंदर आकर्षक कण्यावर भर आहे. पाटांचा विकास, स्वच्छता आणि सुशोभीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत.
- नवे पूल व चकचकीत रस्ते तयार करण्यात येत आहेत. नवीन पूल उड्डाणपूल व रस्ते बांधून वाहतुकीची सुलभता सुनिश्चित केली जाणार आहे.
- सिंहस्थासाठी सात नवे वाहनतळ विकासित करण्याचा निर्णय. यात समावेशक आरक्षणाअंतर्गत विकसित बार, गोदावरी नदीकाठावर दोन व भालेकर हायस्कूलजवळ एक असे वाहनतळ असतील.
- स्मार्टसिटी कंपनीने ‘पीपीपी तत्त्वावर उभारलेल्या ३३ ठिकाणी वाहनतळ व्यवस्थापन करणार.
- मनपा आरोग्य विभागाने सिंहस्थातील भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने व्यापक नियोजन केले आहे. याअंतर्गत तपोवनातील मैदानात शंभर खाांचा उपयोगासाठी स्वतंत्र तात्पुरता दपाखाना उभारण्यात येणार आहे.
- भाविकाच्या सुरक्षिततेसाठी तसेच कायदा सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीकडून शहरात ५,३०० कायमस्वरुपी सीसीटीव्ही लावणार भाविकांची अचूक गाना करण्यासाठी आय तंत्रज्ञानाचा वापर होणार.




