Sunday, May 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSimhastha Kumbhmela 2027 : कुंभमेळ्यासंबंधित विकास कामांची मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून...

Simhastha Kumbhmela 2027 : कुंभमेळ्यासंबंधित विकास कामांची मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून पाहणी

वेळेत कामे पूर्ण करण्याच्या यंत्रणांना दिल्या सूचना

नाशिक | जिमाका वृत्तसंस्था Nashik

- Advertisement -

सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर आणि परिसरात सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधा विषयक कामांना मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी भेटी दिल्या. पायाभूत सुविधांची कामे विहित वेळेत आणि दर्जेदार झाली पाहिजेत. त्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी काम करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.

मुख्य सचिव अग्रवाल यांनी आज कुंभमेळा विषयक रस्ता कामे तसेच रेल्वे विषयक विकास कामे, विमानतळ विस्तारीकरण, पार्किंग सुविधा आदी कामांना भेटी दिल्या. कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक पुनीत अग्रवाल, कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत औटी, अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग, विमानतळ प्राधिकरण आणि एचएएलचे अधिकारी तसेच विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्य सचिव अग्रवाल यांनी सुरुवातीला स्व. मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल येथे जाऊन पाहणी केली. तेथे सिंहस्थ कुंभमेळा कालावधीत करावयाच्या पार्किंग सुविधा संदर्भातील नियोजनाची माहिती घेतली.

मुख्य सचिव अग्रवाल यांनी ओढा रेल्वे स्टेशन येथे जाऊन तेथे होत असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक पुनीत अग्रवाल आणि विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी माहिती दिली. नाशिक रोड रेल्वे स्थानकासह ओढा, कसबे सुकेणे, खेरवाडी, देवळाली कॅम्प रेल्वे स्थानक परिसर विकास, प्रवाशांसाठी सोई सुविधा, येणाऱ्या भाविकांसाठी बस कनेक्टिव्हिटी आदींची माहिती मुख्य सचिव अग्रवाल यांनी घेतली. ओढा येथे कुंभमेळा साठी बांधण्यात येत असलेल्या घाट कामांचीही त्यांनी पाहणी केली.

त्यानंतर मुख्य सचिव अग्रवाल यांनी, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणामार्फत मुंबई धुळे महामार्गावरील नाशिक शहरातील विकास कामांची पाहणी केली. कामांची गती वाढविण्याच्या सूचना यावेळी त्यांनी यंत्रणेला केल्या. काम करताना प्रशासकीय आणि तांत्रिक पातळीवर काही अडचणी जाणवत असतील तर त्या तत्काळ निदर्शनास आणून द्याव्यात आणि कोणत्याही परिस्थितीत कामांना विलंब होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी सर्व यंत्रणांना केल्या.

विमानतळ विस्तारीकरण कामाचीही त्यांनी पाहणी केली. ही कामे करताना यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय ठेवून कोणतीही तांत्रिक अडचण जाणवणार नाही , याची काळजी घ्यावी. एकदा सुरू केलेली कामे बंद राहणार नाहीत. त्याची गती कायम राखत ती वेळेत पूर्ण होतील, ही सर्व यंत्रणांची जबाबदारी आहे, त्यादृष्टीने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळेस सर्व संबंधित विभागामार्फत सुरू असलेल्या कामांची माहिती उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली.

ताज्या बातम्या

Pune News : माझ्या मुलीला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत…; नसरापुर...

0
पुणे |प्रतिनिधी| Pune पुणे (Pune) जिल्ह्यातील भोर (Bhor) तालुक्यातील नसरापूर (Nasarapur) येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, या प्रकरणातील पीडित...