Sunday, June 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSimhastha Kumbhmela 2027 - सिंहस्थ कुंभमेळा नियोजनासाठी उद्या आढावा बैठक

Simhastha Kumbhmela 2027 – सिंहस्थ कुंभमेळा नियोजनासाठी उद्या आढावा बैठक

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीसाठी गुरुवार, १५ ऑगस्ट रोजी सकाळी स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहणानंतर महत्त्वपूर्ण आढावा बैठक होणार आहे. बैठकीचे अध्यक्षस्थान विभागीय महसूल आयुक्त आणि सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण गेडाम भूषवणार असून, मनपा अतिरिक्त आयुक्त नायर सचिव म्हणून उपस्थित राहणार आहेत. जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभाग, मनपा, पोलिस, पर्यटन, वन आणि इतर संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीत सहभागी होणार आहेत.

बैठकीत पायाभूत सुविधा विकास, वाहतूक व्यवस्थापन, गर्दी नियंत्रण, सुरक्षा उपाययोजना, पर्यटन सुविधा अशा विविध मुद्द्यांवर चर्चा होणार होण्याची शक्यता आहे.

या बैठकीमध्ये काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते त्यात प्रामुख्याने रिंग रोडचे भूसंपादन आणि बांधकाम, तसेच वेळापत्रक निश्चित करणे, त्र्यंबकेश्वर गोदावरी वॉटर ग्रीड योजनेची तांत्रिक मान्यता व निविदा प्रक्रिया, त्र्यंबकेश्वर व नाशिक घाट बांधकाम आणि भूसंपादन, डीपी रोडवरील अतिक्रमण हटवणे व बांधकामाची सद्यस्थिती, बेजे धरण पाणीपुरवठा योजना व इतर पाणी योजना, नाशिक रोड रेल्वे स्टेशन व ओझर विमानतळ विकास, साधुग्राम नाशिक भूसंपादन आणि आखाडा परिसर विकास, पर्यटनाशी संबंधित प्रकल्प, देवस्थान विकासकामे आणि शासकीय विश्रामगृहांची दुरुस्ती या प्रमुख मुद्द्यांची चर्चा होण्याची शक्यता आहे.

तसेच सिंहस्थ नियोजन व व्यवस्थापनातील प्राधान्यक्रमात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, गर्दीचा अंदाज घेऊन प्रभावी उपाय योजना व व्यवस्थापन, वाहतूक व पार्किंग व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था आणि उपाययोजना, सी एस आर व पीपीपी संकल्पनेवर लोकसहभाग वाढवणे, भाविकांचे स्वागत, सुविधा आणि स्मरणीय अनुभव, ब्रह्मगिरी पर्वत परिसरात वृक्षारोपण आणि उत्खननबंदी नदी मुद्द्यांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे

कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत प्रत्येक विभागाला कामाची दिशा आणि कालमर्यादा स्पष्ट केली जाणार आहे. या बैठकीतून पुढील काही महिन्यांसाठीचा ठोस रोडमॅप तयार होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या

शेत रस्त्याच्या वादातून तरुणास मारहाण

0
मानूर | वार्ताहर Manur कळवण तालुयातील भादवण शिवारात शेतजमिनीच्या वहिवाट रस्ता वादातून एका तरुणासह त्याच्या वडिलांना मारहाण केली. यामुळे मारहाण झालेल्या युवकाने विष घेत आत्महत्या...