Sunday, November 22, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसिंहस्थ महाकुंभमेळा २०२७ : पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते रामतीर्थ येथे गंगापूजन व...

सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७ : पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते रामतीर्थ येथे गंगापूजन व धार्मिक विधी

- Advertisement -

नाशिक, दि. ३० (जिमाका वृत्तसेवा) :

नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या शुभारंभानिमित्त शनिवार ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज सकाळी सपत्नीक नाशिक येथील रामतीर्थावर गंगापूजनासह विविध धार्मिक विधी केले.

यावेळी महापौर हिमगौरी आडके अहिरे, आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, भक्तीचरणदास महाराज, जगद्गुरू नरेंद्राचार्य, जगद्गुरू वल्लभाचार्य महाराज, तसेच पुरोहित संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

या धार्मिक विधींमध्ये गणेशपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, सर्वतोभद्र मंडळ पूजन, योगिनी पूजन, क्षेत्रपाल पूजन आणि ध्वजस्तंभ स्नपन विधी करण्यात आले. यावेळी ध्वजस्तंभ प्राणप्रतिष्ठेचाही धार्मिक विधी पार पडला.

दरम्यान, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज सकाळी त्र्यंबकेश्वर येथे भेट देऊन राष्ट्रपती महोदयांच्या नियोजित दौऱ्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा व व्यवस्थेचा आढावा घेतला.

ताज्या बातम्या

Nashik : शिवतीर्थावर दीपोत्सवाचा लखलखाट; ‘महाकुंभ’ नावाची भव्य दीपमांडणी

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik हजारो पणत्यांच्या लखलखाटात 'महाकुंभ’’ नावाची भव्य दीपमांडणी, पारंपरिक गोदा आरती, फटाक्यांची आतषबाजी आणि लोकसंगीताच्या सुरांनी शिवतीर्थ परिसर रविवारी (दि. २२) उजळून...