Friday, November 6, 2026
HomeनगरAhilyanagar : सीना नदीच्या पूर रेषेतील बांधकाम परवानग्या चुकीच्या

Ahilyanagar : सीना नदीच्या पूर रेषेतील बांधकाम परवानग्या चुकीच्या

मनपाची कबुली, शासनाला कळवणार

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातून वाहणार्‍या सीना नदीच्या पूर रेषेत ले-आऊट व बांधकाम परवानगी दिली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मनपा नगररचना विभागाच्या सहायक संचालक स्नेहल यादव यांनी शनिवारी मनपाच्या बजेट महासभेत जाहीर केली. आतापर्यंत अशा दिलेल्या बांधकाम परवानग्या चुकीच्या असल्याची कबुली देताना याबाबत शासनाला कळवले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पीएनजी गॅस पाईपलाईनसाठी नव्याने करण्यात आलेले रस्ते खोदण्यास नगरसेवकांनी विरोध दर्शवला व रस्ते खोदू दिले जाणार नाहीत, असा पवित्राही जाहीर केला.

- Advertisement -

मनपाच्या बजेट सभेत शुक्रवारी (27 मार्च) नगरसेवक श्रीपाद छिंदम याला सत्ताधार्‍यांनी हाकलून लावले होते. त्यानंतर गुंडाळलेली महासभा शनिवारी पुन्हा सुरू झाली. नागरी समस्यांचे विषयच नगरसेवकांनी ऐरणीवर घेतले. प्रत्यक्ष बजेटवर चर्चा झालीच नाही. सीना नदीच्या ब्लू लाईनमध्ये अंतिम मंजुरी असलेल्या ले-आऊटमध्ये बांधकाम परवानगी का देत नाही?, असा सवाल नगरसेवक मयूर बांगरे यांनी केला. नगर रचना विभागाचे अभियंता वैभव जोशी यांनी ब्लू लाईनमध्ये परवानगी देता येत नाही, असे स्पष्ट केले. त्यावर नगरसेवक विकास जगताप यांनी जर परवानगी देता येत नाही, तर ले-आऊट का मंजूर झाले?, असा सवाल केला. अविनाश घुले यांनी, अनेकांची अडचण आहे, आयुष्याची जमा पुंजी लावतात.

नागरिकांची फसवणूक होते, असे भाष्य केले. यावर बोलताना नगररचना सहायक संचालक स्नेहल यादव म्हणाल्या, ब्लू लाईनमध्ये परवानगी देता येत नाही, तत्कालीन अधिकार्‍यांनी दिली असेल तर ती चुकीची आहे. त्यावर जगताप यांनी, एकाच ले-आऊटमध्ये दहा जणांना परवानगी व इतरांना का नाही?, असा सवाल केला. वारे यांनी गॅस पाईपलाईन खोदाईचा शासन आदेश आहे का, असा सवाल केला. त्यावर आयुक्त यशवंत डांगे यांनी तसा आदेश असल्याचे स्पष्ट केले. वारे म्हणाले, शासनाने एक पत्र दिले, पण, त्यातून शहर उद्ध्वस्त होईल. यापूर्वी त्यांनी खोदाईची परवानगी घेतली होती. ते काम मुदतीत केले नाही. कराराचा भंग केला. त्यामुळे त्यांना नव्याने खोदाईची परवानगी देण्याचा प्रश्नच नाही.

शासनाला वस्तुस्थिती कळवा, ठराव करा, नव्याने अनेक रस्ते झाले आहेत, त्यामुळे कोणीही ते फोडू देणार नाही. हा आदेश आम्हाला मान्य नाही, असे शासनाला कळवा, अशी मागणी केली. गणेश भोसले यांनीही नवीन रस्ते फोडू देणार नाही, असा पवित्रा जाहीर केला. बाबासाहेब वाकळे यांनी ज्या भागात खोदाईची परवानगी दिली नाही, तेथे कनेक्शन कसे दिले? कुणी परवानगी दिली?, असे सवाल केले.

ताज्या बातम्या

संपादकीय : ६ नोव्हेंबर २०२६ – ट्रम्प यांच्या मनमानीला चाप

0
अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाला बसलेला धक्का हा केवळ जागांचा पराभव नाही, तर सत्तेच्या अमर्याद आत्मविश्वासाच्या जोरावर चालविलेल्या वावदूकपणाला मतदारांनी...