Thursday, May 2, 2024
Homeनाशिकदिलासा : ‘सिन्नर’चे येवला कनेक्शनही निगेटिव्ह

दिलासा : ‘सिन्नर’चे येवला कनेक्शनही निगेटिव्ह

सिन्नर । प्रतिनिधी

शहरात आढळलेल्या पहिल्या ‘करोना’बाधीत रुग्णाच्या कुटूंबांतील सर्व 17 स्वॅब तपसाणी अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर ‘येवला कनेक्शन’ असलेल्या तानाजी चौकातील 8 संशयितांचे अहवालही निगेटीव्ह आल्याने सिन्नरकरांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

शहरातील डुबेरे नाक्याजवळील एका खासगी रुग्णालयातील सहाय्यक डॉक्टर ‘करोना’ पॉझीटीव्ह निघाल्यानंतर सिन्नरकरांची धडधड वाढली होती. मात्र, त्याचवेळी पहिल्या रुग्णाशी संबधीत सर्व 27 संशयीतांचे तपासणी अहवाल निगेटीव्ह आले होते.

या सर्व संशयीतांंचे स्वॅब 2 मे रोजी घेण्यात आले होते. नाशिकला स्वॅब तपासणी लॅब सुरु झाल्यानंतरही त्यांचे अहवाल यायला 5 दिवस लागले होते. त्यामूळे तानाजी चौकातील 8 संशयीतांचे स्वॅब नाशिकऐवजी पूण्याला पाठवण्यात आले होते. अवघ्या 24 तासाच त्यांचे अहवाल प्राप्त झाले असून सर्व 8 ही संशयीतांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

त्याव्यतिरिक्त नाशिक येथे निधन झालेल्या महिलेच्या पतीसह चौघांचे अहवाल अजून प्रलंबीत आहेत. त्यातच नव्याने पॉझीटीव्ह आलेल्या सहाय्यक डॉक्टरशी संबध आलेल्या 12 ते 15 संशयितांचे स्वॅब गुरुवारी (दि.7) उशिरा पाठवण्यात आले आहेत.

या डॉक्टरने तपासलेल्या रुग्णांचा, त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेतला जात असून अशा संशयीतांची संख्या वाढूही शकते. आज (दि.8) जिल्हाभरातील अनेक संशयीता पॉझीटिव्ह निघाले. मात्र, त्यात सिन्नरचा एकही रुग्ण नसल्याने सिन्नरकरांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या