Friday, May 3, 2024
Homeनाशिक'स्मार्ट स्कूल' : नाशिकच्या काठेगल्ली शाळेचा देशात दुसरा क्रमांक

‘स्मार्ट स्कूल’ : नाशिकच्या काठेगल्ली शाळेचा देशात दुसरा क्रमांक

नाशिक । प्रतिनिधी Nashik

केंद्राच्या इकोनॉमिक्स टाईम्स गव्हमेंट डिजिटेकने स्मार्ट स्कूल स्पर्धेतील सर्वेक्षणात काठेगल्ली शाळेला डिजिटल या कॅटेगरीत देशभरात दुसरा क्रमांक मिळाला आहे. गोव्यात पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. नाशिक महापालिका शिक्षण विभागाला रौप्य पदकाने सन्मानित करण्यात आले.

- Advertisement -

स्मार्ट स्कूल प्रकल्पाअंतर्गत कायापालट झालेल्या नाशिक महापालिकेची काठे शाळा क्रमांक 43 चा देशभरात डंका वाजला आहे. अनेक दिवसांपासून नाशिक शहरातील मनपाच्या शाळा स्मार्ट म्हणून विकसित केल्या जात आहेत. यात पालिकेच्या 74 पैकी 457 बिंदूंवर आधारित सर्वेक्षण करण्यात आलेल्या 69 शाळा इमारती येत्या वर्षभरात स्मार्ट सिटीअंतर्गत स्मार्ट स्कूल म्हणून विकसित केल्या जाणार आहेत. त्यासाठी मनपा स्तरावर हालचाली सुरु आहेत.

नाशिक महापालिकेच्या माध्यमातून स्मार्ट स्कूल ही संकल्पना राबविण्यात येत असून स्मार्ट स्कूल या महत्वाच्या प्रकल्पांतर्गत स्मार्ट सिटीमार्फत 69 शाळांचे 656 वर्ग डिजिटलाईज होणार आहेत. येत्या या निकषांवर झाली निवड क्लासरुममध्ये पारंपरीक फळ्यासोबतच स्मार्ट बोर्ड नवीन बेंचेस इंटरनेट कनेक्शन डीजिटल अभ्यासक्रमाची शैक्षणिक सुविधा पूर्ण शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे 21 संगणकांचा एक कक्ष ऑगस्ट अखेरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

त्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळांना स्मार्ट बनविण्याचे काम सुरु आहे. दरम्यान शहरातील काठे गल्ली येथील मनपा शाळा क्र. 43 मध्ये आठ स्मार्ट पायलट क्लासरुम सुरु करण्यात आले आहेत.एक कोटी रुपयांचा निधी खर्च करून शाळेला डिजीटल बनवत रुपडे पालटवण्यात आले.याची दखल केंद्र सरकारने घेत इकोनॉमिक्स टाईम्स गर्व्हमेंट डिजिटेक या संस्थेने देशभरात स्मार्ट स्कूलची पहाणी केली. उपक्रमात सहभागी झालेल्या शहरांना भेटी दिल्या. या संस्थेच्या पथकाने काठे गल्ली शाळेला भेट देत डिजीटल स्कूलची पाहणी केली. या स्पर्धेत काठे गल्ली शाळेला देशात दुसरा क्रमांक देण्यात आला.

गोव्यात गव्हर्मेंंट डिजिटल अवॉर्ड 2023 पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यास महापालिका शिक्षणाधिकारी बी. जी. पाटील, स्मार्ट सिटीचे वरिष्ठ अधिकारी अनिल तडपुडे उपस्थित राहून त्यांनी सन्मान स्वीकारला. येणार्‍या काळात मनपाच्या शाळांत गुणवत्ता वाढ, विद्यार्थी संख्या वाढवणे व ती टिकवणे या त्रिसुत्रीवर काम केले जाईल, अशी माहिती मनपा शिक्षणाधिकारी बापूसाहेब पाटील यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या