Thursday, May 2, 2024
Homeजळगावचाळीसगाव : लसीकरणासाठी लोकप्रतिनिधीची उदासिनता

चाळीसगाव : लसीकरणासाठी लोकप्रतिनिधीची उदासिनता

चाळीसगाव Chalisgaon प्रतिनिधी-

जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने कहर सुरु आहे. कोरोनामुळे तालुक्यात ८८ जणांचा मृत्यू झाला असून आजघडीला ४५२ कोरोग्रस्त उपचार घेत आहेत. कोरोनावर नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहिम सुरु झाली आहे. लसीकरण मोहिम राबविली जात आहे. शहरासह तालुक्यात १३ केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. परंतू गेल्या काही दिवसांपासून कोविशील्ड व्हॅक्सिनचे डोस पाहिजे त्याप्रमाणात जिल्ह्यातून उपलब्ध होत नसल्यामुळे लसीकरण मोहिम धिम्या गतीने चालू आहे.

- Advertisement -

आजघडीला पाच ते सहाच केद्रांवर लसीकरण सुरु आहे. तर शहरासह इतर केंद्रांवर लसीकरण बंद आहे. लसीकरण बंद असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. याबाबत तालुक्यातील खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधीमध्येे गार्ंभीय दिसत नाही. आतापर्यंत खासदार व आमदारांनी वारंवार ग्रामीण रुग्णालयात भेटी दिल्यात, परंतू तालुक्यासाठी जास्त प्रमाणात लसीचा साठ कसा उपलब्ध होईल ? यावर भर देतांना ते दिसून आले नाहीत. त्यामुळे फक्त रुग्णालयात भेटी देवून नव्हे, तर तालुक्यात जास्तीचा लसीचा साठ कसा उपलब्ध होईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे.

तालुक्यात गेल्या चार महिन्यांपासून कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. रुग्ण उपचार करण्यासाठी शासकिय व ग्रामीण रुग्णालयात दाखल होत आहे. परंतू वाढत्या रुग्ण संख्येमुळे बेडची कमरता भासत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत तालुक्यात ६ हजार २१८ जण कोरोना बाधित झाले आहेत. ६ हजार ६७८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर कोरोनामुळे ८८ जणांना आपले प्राण गमावले आहेत. यात बर्‍याच कुटूंबातील एक किवा दोन जणांचा समावेश आहे. कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता शासनाकडून वारंवार नागरिकांना लस टोचण्याबाबत सूचना केल्या जात आहेत. तर डॉक्टरांकडून रुग्णांना लसीकरणाबाबत सुचवले जात आहे. तालुक्यातील १० आरोग्य उपकेद्रांसह शहरातील ग्रामीण रुग्णालय, बापजी रुग्णालय व शैलजा हॉस्पिटल अशा तब्बल १३ ठिकाणी लसीकरण सुरु आहेत. एक केद्रावर दररोज १०० ते २०० जणांना लसीकरण करण्याचे उद्दिष्टये आहे. परंतू जिल्ह्यातून डोस उपलब्ध होत नसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून निम्म्या ठिकाणी लसीकरण बंद आहे. शहरातील ग्रामीण रुग्णालयात गेल्या पाच दिवसांपासून लसीकरण बंद आहे. तर दोन खाजगी रुग्णायात देखील लसीकरण बंद असल्याची माहिती मिळाली आहे. ग्रामीण भागात गुरुवारी फक्त पाच केंद्रावर लसीकरण सुरु होते. यात लोंजै, राजणगांव, शिरसगाव, तळेगाव, वाघळी आदि केद्रांचा समावेश आहे. तर इतर ठिकाणी साठा नसल्यामुळे लसीकरण बंद होते. बर्‍याच जणांनी लसीकचा पहिला डोस घेतला, परंतू दुसर्‍या डोससाठी त्यांना वणवण करावी लागत असून पहिल्या डोस घेतल्यानतंरचे अंतर वाढत आहे. आता तालुक्यात सोमवारी लसीचा नवीन साठा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आणि त्यानतंर लसीकरण नियमित सुरु होईल. तोपर्यंत मात्र लोकांना लसीकरणापासून वंचित राहावे लागणा आहे.

लोकप्रतिनिधीन लसीच्या साठ्यासाठी प्रयत्न करावेत-

तालुक्यात आतापर्यंत तब्बल १० ते ११ हजार जणांनी लस टोचून घेतली आहे. तालुक्याची लोकसंख्या तब्बल साडेतीन लाख आहे. लोकसंख्येच्या मानाने तालुक्यात अजुन अर्धा टक्का सुध्दा लसीकरण झाले नाही. त्यामुळे येणार्‍या काळात लसीकरण मोहिम आधिक तेज करण्याची गरज आहे. त्यासाठी फक्त लोकप्रतिनिधीनी आरोग्य यंत्रणेची वारंवार पाहणी न करता, केद्रांतून जिल्ह्यात व जिल्ह्यातून तालुक्यात कोविशील्ड व्हॅक्सिनचे जास्ती-जास्त डोस कसे उपलब्ध होईल ? यासाठी प्रमाणिक प्रयत्न केले पाहिजे. फक्त प्रसिद्धीसाठी रुग्णालयात भेटी देवून उपयोग होणार नाही. तालुक्यातील मतदारांचा जीव वाचविण्यासाठी लसीकरणावर जीव ओतून लोकप्रतिनिधीना काम करावे लागणार आहे. तरच लोकांनी योग्य प्रतिनिधीला निवडून दिल्याचे सिद्ध होणार आहे.

केंद्रिय आरोग्य मंत्री हर्ष वधन यांच्याशी आज व्हीसीव्दारे बैठक झाली असून त्यांनी २० लाख नवीन डोस राज्याला देण्याचे सांगीतले आहे. जळगाव जिल्ह्यात येत्या काही दिवसात लसीकरणासाठी जास्ती-जास्त केंद्राची निर्मिती करुन, लसीकरणाची मोहिम व्यापक पद्धतीने राबवून, महाराष्ट्रात नव्हे, तर देशात जिल्हा लसीकरणाबाबत जिल्हा नंबर एकवर कसा राहिल यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच तालुक्यातील जास्तीच्या लसीकरणावर भर राहिल.

– उन्मेष पाटील, खासदार

मी आजच जिल्हाधिकार्‍यांकडे बैठकीबाबत वेळ मागीतली आहे. तालुक्यात लसीकरणासह २० ते २२ विषयांवर मी त्यांच्याशी चर्चा करणार असून ते सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. तसेच तालुक्यासाठी जास्ती-जास्त कोविशील्ड व्हॅक्सिनचा साठ कसा उपलब्ध होईल, यासाठी पाठपुरावा करणार आहे. तालुकावासियांना चांगली आरोग्य सुविधा कशी देता येईल, यासाठी प्रमाणिक प्रयत्न चालू आहेत.

मंगेश चव्हाण, आमदार

लसीकरण्याच्या तुटवड्याबाबत जिल्हाधिकारी व प्रातांधिकारी यांच्याशी चर्चा केली आहे. तालुक्याची लोकसंख्या व कोरोनाची ऍक्टीव रुग्ण संख्येच्या मानाने जास्ती-जास्त लसीकरणावर भर देण्याबाबत त्यांना विनंती केली आहे. केंद्रातून राज्यात साठा उपलब्ध झाल्याबरोबर तालुक्यात दोन दिवसात साठ उपलब्ध होईल. तसेच यापुढे देखील तालुक्यात कोविशील्ड व्हॅक्सिनचा साठा ऍक्टीव रुग्णाचा मानाने जास्त कसा मिळेल ? यासाठी प्रयत्न चालू आहेत.

राजीव देशमुख, माजी आमदार

खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधीना लोकांच्या समस्या व आरोग्य बाबतच्या समस्यांकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. त्यांचा जास्त वेळ स्वता;चा उद्योग व इतर रिकामे उद्योग वाढीस कसे लागतील यात जात आहे. तालुक्याचे दुर्भाग्य आहे, की आभ्यासू लोकप्रतिनिधी मिळत नाही. फक्त स्टंटबाजी करण्यावरच त्यांचा जास्त भर आहे. लसीकरणाबाबत त्यांना काहीएक देणे-घेणे दिसत नाही. आजच्या घडीला तालुक्याची आरोग्य यंत्रणा काही प्रमाणात विस्कळीत झाली आहे.

प्रा.गौतम निकम, जनआदोलन विभाग

तालुक्यात दिवसेंदिवस कोरोग्रस्तांचे प्रमाण वाढत आहे. परंतू लोकप्रतिनिधीना जनतेच्या लसीकरणाबाबत कळकळ दिसून येत नाही. गेल्या काही दिवसांपासून लसीकरण बंद आहे, लोक रुग्णालयात लसीकरणासाठी चक्रा मारत आहेत. परंतू चाळीसगावच्या लोकप्रतिनिधीना फक्त आपल्या खुर्चा कशा वाचतील याकडे जास्त फोकस असून रिकाम्य उद्योग करण्यावर त्यांचे जास्त लक्ष आहे. राजकारणापेक्षा लोकांच्या जीवाकडे त्यांनी लक्ष देण्याची नितांत गरज आहे.

वर्धमान धाडीवाल, व्यापारी

- Advertisment -

ताज्या बातम्या