Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यानांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात 'इतक्या' पक्ष्यांची नोंद

नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात ‘इतक्या’ पक्ष्यांची नोंद

करंजीखुर्द। वार्ताहर Karanjikhurda

नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात (Nandur Madhyameshwar Wildlife Sanctuary)या हंगामातील दुसर्‍या मासिक पक्षी प्रगणनेत विविध जातीचे 9,103 पक्षी आढळून आले आहेत.

- Advertisement -

नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात वनअधिकारी, कर्मचारी, स्थानिक गाईड, पक्षीमित्र, वन्यजीव अभ्यासक, स्वयंसेवक यांच्या मदतीने ही प्रगणना पूर्ण करण्यात आली. यात चापडगाव, मांजरगाव, खानगावथडी, गोदावरी नदीपात्र, कोठुरे, कुरूडगाव, काथरगाव अशा एकूण 7 ठिकाणी पक्षी निरीक्षण करण्यात आले.

यात विविध पाणपक्षी व झाडांवरील गवताळ भागातील पक्षी असे 6,105 पाणपक्षी व 2,198 झाडांवरील गवताळ भागातील पक्षी असे एकूण 9,103 पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. या प्रगणनेत विदेशी स्थलांतरित पक्ष्यांची नोंद झाली असून यामध्ये कॉमन क्रेन, नॉर्दन शॉवलर, पिनटेल, गांगनो, युरेशियन, व्हिजन, गडवाल, रुडी शेल डक, मार्श हॅरियर, मॉन्टेग्यू हॅरियर, ब्लू ब्रोड, ब्लू चिक, बी ईटर तसेच स्थानिक स्थलांतरित पक्षी उघड्या चोचीचा बगळा, जांभळा बगळा, राखी बगळा, स्पॉट बिल डक, बिल, रिव्हर टन, कमळ पक्षी, शेकाट्या, जांभळी पाणकोंबडी, नदीसुरय आदी पक्षी आढळून आले आहेत. पावसाळा लांबल्याने व थंडीचे आगमन उशिरा झाल्याने स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन लांबले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या