Friday, May 3, 2024
Homeनाशिकसामाजिक संस्थांच्या पुढाकाराने खोकरीपाड्याची भागली तहान

सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने खोकरीपाड्याची भागली तहान

पेठ । Peth

गेली अनेक वर्षे पेठ तालुक्यातील खोकरीपाडा (Khokaripaada) या पाणी टंचाईग्रस्त दुर्गम गावात सामाजिक संस्थांच्या (Special organizations) पुढाकाराने अखेर पाणी पोहोचले आहे. आदिवासी भागातील खेड्यांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणारी एसएनएफ (SNF) आणि लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेट (Lion’s club of Nashik corporate) या दोन संस्थांच्या अथक परिश्रमातून ही योजना आकाराला आली आहे…

- Advertisement -

खोकरीपाडा या पेठ तालुक्यातील (Peth taluka) गावात पाण्याचा श्रोत नसल्याने १ किलोमीटर पायपीट करत महिला मुले रोज डोक्यावर पाणी आणायचे. गावकऱ्यांनी आपली व्यथा एके दिवशी एसएनएफकडे मांडली. विहिरीपासून पाइपलाइनने पाणी (water) आणून गावात टाकी बांधली तर गावकऱ्यांचे जीवन सुसह्य होणार होते. एसएनएफने ही योजना लायन्स क्लब कॉर्पोरेटला कळवली आणि त्यांनी त्वरित तीन लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर एसएनएफचे तांत्रिक सहकार्य, लायन्सचे आर्थिक योगदान आणि ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे श्रमदान याद्वारे गावात पाणी पोहचवण्यात यश आले.

या सोहळ्यासाठी लायन्स क्लबचे अध्यक्ष विनय बिरारी, सचिव नंदकिशोर लाहोटी, सेवाकार्य अध्यक्ष अजय सानप, लायन अनंत पाटील, लायन मनिष जाधव, लायन कैलास पवार आदी पदाधिकारी तसेच एसएनएफचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, समन्वयक रामदास शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ग्रामस्थांनी गावकऱ्यांचे जल्लोषात जलकुंभाचे पूजन केले. वाद्य व नृत्याच्या मिरवणुकीत गावात पाण्याच्या हंड्यांची मिरवणूक काढण्यात आली.

याप्रसंगी बारकू रिजड, पोपट भूसारे, नामदेव खोटरे, ग्रामसेवक पखाने, छबूनाथ चौधरी, प्रशांत गर्जे, पुंडलिक टोकरे, नामदेव भांगरे, लक्ष्मण रिंजड, वसंत पाडवी, पंढरीनाथ दरोडे, जिजाबाई कुंभारे,येणूबाई रिजड, विजय भांगरे, विनोद खोटरे, संदिप डगळे यांच्यासह सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी, महिला उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या