Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रSolapur news : शेअर बाजारातील तोट्यातून हसतेखेळते कुटुंब उद्ध्वस्त; मुख्याध्यापकाने पत्नी अन्...

Solapur news : शेअर बाजारातील तोट्यातून हसतेखेळते कुटुंब उद्ध्वस्त; मुख्याध्यापकाने पत्नी अन् दोन मुलांसह जीवन संपवलं

सोलापूर । Solapur

- Advertisement -

आधुनिक युगात झटपट श्रीमंत होण्याच्या सुसाट धावेमध्ये मानवी आयुष्य किती असुरक्षित बनत चालले आहे, याची प्रचिती देणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून समोर आली आहे. तालुक्यातील हत्तीज गावात एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, एक हसतेखेळते कुटुंब आर्थिक गर्तेमुळे एका झटक्यात उद्ध्वस्त झाले आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी आपली पत्नी माधुरी पाटील, मोठा मुलगा अथर्व पाटील आणि लहान मुलगा शिवांश पाटील या तिघांना विष देऊन स्वतः गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, योगेश पाटील हे गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजार (स्टॉक मार्केट) मधील कोट्यवधी रुपयांच्या मोठ्या आर्थिक नुकसानीमुळे प्रचंड मानसिक तणावाखाली होते. या विवंचनेतूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते.

घटनास्थळाचा पंचनामा करताना पोलिसांना मृत योगेश पाटील यांच्या खोलीतून तब्बल २२ पानांची सविस्तर सुसाईड नोट मिळाली आहे. यामध्ये त्यांनी आपल्यावर असलेले कर्ज, विविध लोकांशी केलेले आर्थिक व्यवहार आणि एकूण कर्जबाजारीपणाचा संपूर्ण तपशील लिहून ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. नेहमीप्रमाणे पाटील यांच्या घराचा दरवाजा सकाळी उशिरापर्यंत उघडला गेला नाही. त्यामुळे आजूबाजूच्या शेजाऱ्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. त्यांनी तात्काळ आवाज दिला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी गावकऱ्यांनी एकत्र येत घराचा दरवाजा तोडला असता, आतमध्ये अत्यंत विदारक दृश्य पाहायला मिळाले.

दरम्यान, निष्पाप पत्नी आणि दोन लहान मुलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी मृत मुख्याध्यापक योगेश पाटील यांच्या विरोधात बार्शी पोलीस ठाण्यात खुनाचा (मर्डर) गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या भीषण घटनेमुळे संपूर्ण हत्तीज गावासह बार्शी तालुक्यावर तीव्र शोककळा पसरली आहे.

ताज्या बातम्या

Pathardi : दुष्काळ सदृश्य परिस्थितीतही विहीर तुडुंब !

0
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi श्रीक्षेत्र भगवानगडाच्या पायथ्याशी नागलवाडी-बोधेगाव रस्त्यालगत डोंगराच्या कुशीत भगवानगडाच्या शेतजमिनीला लागून असलेली विहीर सध्या परिसराचे लक्ष वेधून घेत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून...