Friday, September 11, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदुर्दैवी : विहिरीत पडलेल्या आईला वाचवण्यासाठी मुलाची उडी, दोघांचाही मृत्यू

दुर्दैवी : विहिरीत पडलेल्या आईला वाचवण्यासाठी मुलाची उडी, दोघांचाही मृत्यू

त्र्यंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshwar

- Advertisement -

तालुक्यातील दुडगाव शिवारातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. आईला वाचवण्याच्या प्रयत्नात मुलाचाही विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुडगाव येथील काजळी मळा परिसरात सोमवार, दि. ३० मार्च २०२६ च्या रात्री एक मोठी दुर्घटना घडली. रात्री ११ वाजेच्या सुमारास ४० वर्षीय देवयानी निलेश शिंदे या आपल्या शेतातील विहिरीत अचानक पडल्या.आई विहिरीत पडल्याचे पाहताच, त्यांना वाचवण्यासाठी त्यांचा २१ वर्षीय मुलगा अथर्व निलेश शिंदे याने तात्काळ विहिरीत उडी घेतली. मात्र, दुर्दैवाने आईला वाचवण्याच्या प्रयत्नात मुलाचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. आई आणि मुलाचा असा एकाच वेळी अंत झाल्याने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात याप्रकरणी ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे. दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करून ते अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गावित आणि बीट हवालदार शांताराम निंबेकर करत आहेत.

एकाच वेळी आई आणि तरुण मुलाचा असा अपघाती मृत्यू झाल्याने दुडगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या

अभियोगपूर्व

Nashik ACB News: एसीबीचा दणका, शासनाचा ब्रेक ! ४३५ अभियोगपूर्व प्रकरणे...

0
नाशिक | भारत पगारेलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) (Anti Corruption Beuro) लाचखोर अधिकारी (Corrupt Officer) आणि कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडून त्यांच्यावर कारवाई केली असली, तरी पुढे...