Tuesday, June 16, 2026
Homeक्राईमKopargav : सोनेवाडीच्या पोलीस पाटलावर हल्ला

Kopargav : सोनेवाडीच्या पोलीस पाटलावर हल्ला

भाऊ, मुलगा आणि पुतण्यासही मारहाण

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

डीजे बंद करा सांगितल्याचा राग आल्याच्या कारणांमुळे पोलीस पाटील दगू गुडघे यांना मारहाण करण्यात आली. पोलीस पाटील दगू गुडघे जखमी झाले आहे. गुडघे यांना सोडवण्यासाठी गेले असता संजय गुडघे, निलेश गुडघे, नवनाथ गुडघे, अविनाश गुडघे यांनाही मारहाण करण्यात आली. ही घटना कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे काल रविवारी रात्री नऊ वाजता घडली.

- Advertisement -

अशोक चंद्रभान गुडघे यांच्या घरी डीजे चालू असताना त्याचा आवाज कमी करा असे सांगितले. याचा राग आल्याने डीजे चालक किरण शांताराम गुडघे, सागर जालिंदर गव्हाणे, सोमनाथ जालिंदर गव्हाणे, गणेश अशोक गुडघे, अमोल अशोक गुडघे, संगिता अशोक गुडघे, अशोक चंद्रभान गुडघे व गोरख बाळासाहेब गव्हाणे, विजय चंद्रभान गुडघे यांनी पोलीस पाटील राहत असलेल्या घरी येत त्यांना बेदम मारहाण केली. तसेच भाऊ, मुलगा, पुतण्या यांना मारहाण झाली. गावातील तरुणांना हा प्रकार कळल्यानंतर त्यांनी पोलीस पाटलांच्या घराकडे धाव घेतली तेव्हा हल्लेखोर पसार झाले.

घटना कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांना समजताच त्यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक धरमसिंग सुंदरडे व पथक घटनास्थळी दाखल झाले. डीजे पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. रात्री उशिरा पोलीस पाटील यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संबंधीत डीजे पोलिसांनी ताब्यात घेतला असून हल्लेखोरांचा शोध सुरु आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : लाचलुचपत विभागाचे बनावट अधिकारी गजाआड! आलिशान गाडीसह...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik सरकारी कार्यालयात रुबाब दाखवून आणि आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (Anti-Corruption Bureau) बडे अधिकारी असल्याचे भासवून दिशाभूल करणाऱ्या एका हायप्रोफाइल टोळीचा...