Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशकर्नाटक पाठोपाठ 'या' राज्यात 'ओमिक्रॉन'चा शिरकाव; महाराष्ट्राची चिंता वाढली

कर्नाटक पाठोपाठ ‘या’ राज्यात ‘ओमिक्रॉन’चा शिरकाव; महाराष्ट्राची चिंता वाढली

दिल्ली l Delhi

ओमिक्रॉन (Omicron Variant) हा करोनाचा नवा व्हेरीएंट आहे आणि आफ्रिका तसच युरोपमध्ये ह्या नव्या व्हेरीएंटनं धुमाकूळ घातला आहे. ओमिक्रॉन हा करोनाच्या डेल्टापेक्षा कित्येक पट घातक असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेली आहे. (Omicron Variant in India)

- Advertisement -

ओमिक्रॉन व्हेरिएंटवर Covishield प्रभावी आहे का? अदर पूनावाला म्हणाले….

करोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने कर्नाटक पाठोपाठ आता गुजरातमध्येही शिरकाव केला आहे. गुजरातमधील जामगनरमधील एका व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

करोनाचा नवा व्हेरियंट ‘ओमिक्रॉन’ची लक्षणे काय?, कशी घ्याल काळजी?

तीन दिवसांपूर्वी परदेशातून गुजरातमध्ये आलेल्या ११ लोकांना आरटीपीआरनंतर क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी एका ७२ वर्षीय व्यक्तीची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याचे स्वॅब ओमिक्रॉनच्या तपासणीसाठी पुण्याच्या लॅबमध्ये पाठवण्यात आले होते. ७२ तासानंतर या व्यक्तीचा अहवाल आल्यानंतर त्याला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या