Thursday, May 2, 2024
Homeनाशिकसंपूर्ण निधी मार्च अखेर खर्च करा - बाळासाहेब क्षिरसागर

संपूर्ण निधी मार्च अखेर खर्च करा – बाळासाहेब क्षिरसागर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला सन 2019-20 या आर्थिक वर्षात प्राप्त झालेल्या निधीपैकी दीड वर्षांमध्ये अवघा 58 टक्के निधी खर्चित झाला आहे.त्यामुळे उर्वरित चार महिन्यांमध्ये 42 टक्के निधी खर्च करण्याचे आव्हान प्रशासनासमोर राहणार आहे.

- Advertisement -

प्रत्येक विभागप्रमुखांनी आपआपल्या विभागाचा शिल्लक संपूर्ण निधी मार्च 2021 अखेर खर्च करावा, अशा स्पष्ट आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांनी विभागप्रमुखांना दिले आहेत.

जिल्हा परिषद अध्यक्षांनी सोमवारी (दि.9) मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यासह सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन त्यांच्याकडून खर्चाचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. यावर्षी कोव्हिड 19 मुळे शासनाने विकासनिधीमध्ये जवळपास 67 टक्के कपात केली आहे. यामुळे या वर्षी निधीची चणचण असल्याची जिल्हा परिषदेमध्ये ओरड एकावयास मिळते. प्रत्यक्षात मागील आर्थिक वर्षात आलेल्या निधीपैकी 210.91 कोटी रुपये खर्च झाले असून 143.79 कोटी रुपयांचा निधी अद्याप खर्च झालेला नाही.

लपा पूर्व, मेडा, महिला व बालकल्याण, बांधकाम क्रमांक एक, कृषी विभाग, आरोग्य विभाग यांचा 50 टक्क्यांपेक्षा अधिक निधी अखर्चित आहे, अशी माहिती अर्थ व वित्त विभागातर्फे देण्यात आली. यावर मेडा, आरोग्य, महिला व बालकल्याण तसेच बांधकाम विभागाची अनेक कामे निविदा प्रक्रियेत असून ती कामे मार्च अखेरीस खर्च होतील, अशी माहिती संबंधीत विभागप्रमुखांकडून देण्यात आली. सर्व निविदा प्रक्रिया वेळेवर राबवून येत्या सर्व साधारण सभेमध्ये मान्यतेसाठी विहित वेळेत विषयपत्रिकांमध्ये त्यांचा समावेश करावा, म्हणजे काही अडचणी येणार नाहीत, असे निर्देश अध्यक्ष क्षीरसागर यांनी दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या