Tuesday, December 3, 2024
Homeजळगावधनंजय चौधरींच्या प्रचार रॅलीत नागरिकांचा स्वयंस्फूर्तीने सहभाग

धनंजय चौधरींच्या प्रचार रॅलीत नागरिकांचा स्वयंस्फूर्तीने सहभाग

रावेर । प्रतिनिधी

रावेर विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे कॉँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांचा गुरुवारी रावेर तालुक्याच्या पूर्व भागात प्रचार दौरा होता. यावेळी प्रचार दौर्‍याला मतदारांनी अभूतपूर्व प्रतिसाद देत मतदारांनी प्रचंड मतांनी विजयी करण्याचे यावेळी आश्वासन दिले. ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवार चौधरी यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले तर महिलांनी औक्षण करीत आशीर्वाद दिले.

- Advertisement -

रावेर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे कॉँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांनी आज रावेर तालुक्यातील कर्जोत, अहिरवाडी, निरुळ, पाडळे बुद्रुक, पाडळे खुर्द, मोहगण, पिंप्री , मंगरुळ, जुनोने , केर्‍हाळा खुर्द, केर्‍हाळा बुद्रुक, भोकरी या गावांमध्ये जाऊन मतदारांशी संवाद साधला. मतदारांच्या भावना यावेळी उमेदवार धनंजय चौधरी यांनी जाणून घेत त्या सोडविण्याचे आश्वासन दिले. प्रचार फेरीत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत कॉँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आश्वासन दिले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या