Thursday, October 8, 2026
Homeनाशिककादवा कारखान्याच्या सभांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कादवा कारखान्याच्या सभांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आधुनिक लागवड तंत्रज्ञान, एकरी उत्पादनवाढ आणि आगामी गळीत हंगामाच्या नियोजनावर मार्गदर्शन

- Advertisement -

ओझे l विलास ढाकणे

कादवा सहकारी साखर कारखान्याचे वतीने निफाड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी निफाड, चांदोरी, चितेगाव, वऱ्हेदारणा व मांजरगाव येथे ऊस उत्पादक शेतकरी हितगुज व ऊस विकास सभा घेण्यात आल्या. या सभांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सभांमध्ये ऊस लागवड क्षेत्रात वाढ करणे, आधुनिक ऊस लागवड पद्धती, सुधारित ऊस वाणांची निवड, एकरी उत्पादन व उत्पादकता वाढविणे, ठिबक सिंचनाचा प्रभावी वापर आणि पाणी व्यवस्थापन याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ऊस उत्पादनातील अडचणी जाणून घेत शेतकऱ्यांच्या सूचना व अपेक्षांवरही चर्चा करण्यात आली.

कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊस लागवडीचे नियोजन करण्याचे आवाहन केले. कारखान्याची गाळप क्षमता वाढली असून आगामी हंगामासाठी मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त क्षेत्रावर ऊस लागवड करून कादवा कारखान्यास ऊस पुरवठा करावा, असे आवाहन करण्यात आले.

ऊस नोंदणी, लागवड, तोडणी व वाहतूक याबाबत अडचणी असल्यास कारखान्याचे शेतकी अधिकारी, ऊस विकास अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. शेतकऱ्यांना वेळेवर ऊस तोडणीसाठी मजूर उपलब्ध करून देणे, तोडणी व वाहतुकीचे योग्य नियोजन करणे तसेच पारदर्शक वजन व्यवस्था कायम ठेवण्याची ग्वाही कारखाना प्रशासनाने दिली.

ऊसाचे वजन झाल्यानंतर संबंधित ऊस उत्पादकाला एसएमएसद्वारे वजनाची माहिती देण्यात येते. ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त दर देण्याची परंपरा कारखान्याने कायम राखल्याने गेटकेन क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्येही कादवा कारखान्यास ऊस देण्याबाबत सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले.

या सभांना कारखान्याचे संचालक, अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारखाना आणि ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकर होते श्रीरामपुरचे जावई, त्यांच्या निधनाने श्रीरामपुरकरही...

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या जीवनाशी संबंधित अनेक आठवणी आणि माहिती समोर येत आहे. त्यातच नाना पाटेकर यांचे श्रीरामपूरशी असलेले...