Sunday, June 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसाक्षरता अभियानाला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद; एक लाख परीक्षार्थींचा FLNAT परीक्षेत सहभाग -...

साक्षरता अभियानाला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद; एक लाख परीक्षार्थींचा FLNAT परीक्षेत सहभाग – शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील

नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik

- Advertisement -

केंद्र शासन पुरस्कृत ‘उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रम’ अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) राज्यातील सर्व जिल्ह्यांत आज यशस्वीपणे पार पडली. या परीक्षेस राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत जवळपास 1 लाख परीक्षार्थींनी सहभाग नोंदविला, अशी माहिती शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय (योजना) तथा सदस्य सचिव, राज्य साक्षरता मिशन प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे कृष्णकुमार पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सन 2022-23 ते 2026-27 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत असाक्षर नागरिकांना साक्षर करण्यासाठी विविध उपक्रमांची अंमलबजावणी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून सन 2025-26 मध्ये नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांची FLNAT परीक्षा आज रविवार 29 मार्च, 2026 रोजी राज्यातील विविध शाळांमधील परीक्षा केंद्रांवर मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, कन्नड, तेलुगू, तमिळ व बंगाली या माध्यमांत परीक्षा घेण्यात आली. परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या नवसाक्षरांना केंद्र शासनाच्यावतीने प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

या परीक्षेमुळे लाभार्थ्यांमध्ये केवळ साक्षरतेपुरतेच नव्हे, तर आर्थिक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आरोग्य जागरूकता, कुटुंब कल्याण व विविध जीवनोपयोगी कौशल्यांचा विकास होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून येईल, असा विश्वास . पाटील यांनी व्यक्त केला.

यापूर्वी 21 सप्टेंबर, 2025 रोजी झालेल्या परीक्षेत सुमारे 5 लाख असाक्षरांनी सहभाग घेतला होता. यावर्षी सुमारे 1.23 लाख नव्या असाक्षरांनी नोंदणी केली असून त्यापैकी जवळपास 1 लाख परीक्षार्थींनी आजची परीक्षा दिली.

या उपक्रमासाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे व शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्यमंत्री पंकज भोयर यांनी परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हास्तरावर भेटी देऊन परीक्षेच्या कामकाजाचा आढावा घेतला.

राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, प्राचार्य, केंद्रप्रमुख तसेच शिक्षक व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने परीक्षेचे नियोजन व अंमलबजावणी यशस्वीरीत्या पार पाडली. याबद्दल शिक्षण संचालक पाटील यांनी सर्व संबंधितांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : महायुतीचा ‘हॉटेल पॉलिटिक्स’वरती भर; तर मविआत...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad Election) आकडे पाहिले तर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra...