Tuesday, June 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजTeam India Schedule : भारत-ऑस्ट्रेलिया सामान्यांचे वेळापत्रक BCCI कडून जाहीर; कधी आणि...

Team India Schedule : भारत-ऑस्ट्रेलिया सामान्यांचे वेळापत्रक BCCI कडून जाहीर; कधी आणि कुठे होणार लढत?

मुंबई | Mumbai 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्याचे (India Tour) वेळापत्रक जाहीर केले आहे. ऑस्ट्रेलियाचा हा दौरा अ पुरुष क्रिकेट संघाचा आणि महिला संघ संघाचा असणार आहे. दोन ऑस्ट्रेलियन संघांव्यतिरिक्त, दक्षिण आफ्रिकेचा अ संघ देखील भारत दौऱ्यावर येणार आहे.

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाचा महिला संघ (Australian Women Team) ऑस्ट्रेलिया अ व दक्षिण आफ्रिका अ असे पुरुष संघ सप्टेंबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत भारत दौऱ्यावर येणार आहेत आणि एकूण १३ सामने खेळणार आहेत. यात ऑस्ट्रेलिया महिला संघ १४ ते २० सप्टेंबर दरम्यान भारतासोबत (India) ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्याचवेळी, ऑस्ट्रेलिया अ संघ २ मल्टी-डे सामने आणि ३ एकदिवसीय सामन्यांसाठी दौरा करेल. हा संघ १६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान भारत दौऱ्यावर असेल.

दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा २० दिवसांचा असणार

दोन्ही ऑस्ट्रेलियन संघांच्या पुनरागमनानंतर, दक्षिण आफ्रिकेचा अ संघ भारत दौऱ्यावर येईल. त्यांचा दौरा ३० ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि १९ नोव्हेंबरपर्यंत चालेल. म्हणजेच हा दौरा २० दिवसांचा असेल. या काळात,२ मल्टी-डे सामन्यांव्यतिरिक्त, ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल.

सामन्यांच्या तारखा आणि ठिकाणे खालीलप्रमाणे

ऑस्ट्रेलियन महिला संघ भारताविरुद्धचे तिन्ही एकदिवसीय सामने चेन्नईमध्ये खेळाणार आहे. यातील पहिला सामना १४ सप्टेंबर रोजी, दुसरा १७ सप्टेंबर रोजी आणि तिसरा सामना २० सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. तर ऑस्ट्रेलिया अ संघाचे भारत दौऱ्यातील सामने लखनऊ आणि कानपूर येथे होणार आहेत.यामध्ये प्रथम ते मल्टी-डे सामने खेळतील, ज्याचा पहिला सामना १६ सप्टेंबरपासून होईल. दुसरा मल्टी-डे सामना २३ सप्टेंबरपासून खेळला जाईल. हे दोन्ही सामने लखनऊमध्ये होतील. त

सेच ऑस्ट्रेलिया अ संघ कानपूरमध्ये ३० सप्टेंबर, ३ ऑक्टोबर आणि ५ ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार असून, हे तिन्ही एकदिवसीय सामने आहेत. तर दक्षिण आफ्रिकेचा ‘अ’ संघ भारत दौऱ्यादरम्यान बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स येथे त्यांचे मल्टी-डे सामने खेळेल. तसेच त्याचे एकदिवसीय सामने बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होतील. मल्टी-डे सामने ३० ऑक्टोबर आणि ६ नोव्हेंबर रोजी सुरू होतील. तर एकदिवसीय सामने १३ नोव्हेंबर, १६ नोव्हेंबर आणि १९ नोव्हेंबर रोजी खेळवले जातील.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...