Friday, January 23, 2026
Homeक्रीडाAsia Cup 2025 : भारताची विजयी सलामी; युएईचा ५७ धावांत खुर्दा, कुलदीप...

Asia Cup 2025 : भारताची विजयी सलामी; युएईचा ५७ धावांत खुर्दा, कुलदीप सामनावीर

नवी दिल्ली | New Delhi

संयुक्त अरब अमिरातच्या ५८ धावांच्या तोकड्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ९ गड़ी आणि ९३ चेंडूंनी दणदणीत विजय मिळवला. पहिल्याच सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवत गुणतालिकेत देखील खात उघडले. भारताने अवघ्या २७ चेंडूत लक्ष्य गाठले. कुलदीप यादवच्या ४ आणि शिवम दुबेच्या ३ बळींनी संयुक्त अरब अमिरातच्या फलंदाजांचे गुडघे टेकवले.

- Advertisement -

अभिषेक शर्मा (३०) आणि शुभमन गिल (२०), सूर्यकुमार यादवने (७) धावा करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताकडून कुलदीप यादव आणि शिवम दुबेच्या भेदक गोलंदाजीपुढे संयुक्त अरब अमिरात अवघ्या १३.१ षटकात ५७ धावांवर गारद झाला, शराफू आणि वसीम यांच्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.

YouTube video player

भारताकडून सलामीवीर गिल मैदानात दाखल झाले. अभिषेक शर्मा आणि शुभमन अभिषेकने पहिल्याच चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकून मोठ्या विजयाचे संकेत दिले. भारताने पहिल्याच षटकात बिनबाद १० धावा केल्या. अभिषेक शर्माच्या तुफान खेळीला जुनैद सिद्दीकीने ब्रेक लावला. अभिषेकने १८ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह ३० धावांची तुफान खेळी करून झेलबाद झाला. त्यानंतर शुभमन गिल नाबाद २० धावा आणि सूर्यकुमार यादवने नाबाद ७ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना संयुक्त अरब अमिरातने १३.१ षटकात सर्वबाद ५७ धावा केल्या. सलामीवीर मुहम्मद वसीम आणि आलिशान शराफू उतरले. मैदानावर शराफूने हार्दिकच्या गोलंदाजीवर २ चौकार ठोकत दमदार सुरुवात केली. शराफू २२ धावांवर असताना जसप्रित बुमराहने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्याने शराफूला त्रिफळाचित केले. त्यानंतर आलेल्या मोहम्मद जोहेब २ धावा काढून माघारी फिरला. त्याला वरुणचक्रवर्तींन कुलदीप करवी झेलबाद केले. ४.४ षटकात संयुक्त अरब अमिरातने २ गडी गमावत २९ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या राहुल चोपडाला देखील कुलदीप यादवने अवघ्या ३ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला तेव्हा वसीम १९ धावांवर मैदानात होता.

संयुक्त अरब अमिरातने ८.५ षटकात ५० धावा करत आपले ४ गडी गमावल्याने त्यांचा पराभव जवळ आल्याचे दिसत होते. कुलदीप यादवने १ षटकात ३ बळी घेतले, त्यानंतर हर्षित कौशिक २ धावांवर त्रिफळाचित झाला. आसिफ खानदेखील २ धावा करून माघारी फिरला. त्यापाठोपाठ सिमरनजीत सिंह १ धावेवर पायचित झाला. ११.२ षटकात संयुक्त अरब अमीरातची धावसंख्या ७ बाद ५२ धावा अशी दयनिय अवस्था झाली.

ध्रुव पराशरला १ धावेवर दुबेने माघारी धाडले. जुनैद सिद्दीकी भोपळाही न फोडता तंबूत दाखल झाला. त्यानंतर हैदर अलीला कुलदीपने १ धावेवर झेलबाद केले. तर मोहम्मद रोहिद २ धावांवर नाबाद राहीला. संयुक्त अरब अमीरातचा संघ अवघ्या १३.१ षटकात ५७धावांवर गारद झाला. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक ४ आणि शिवम दुबेने ३ तर जसप्रित बुमराह, अक्षर पटेल, वरूण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी १ गडी टिपला.

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी विशेष हेल्पलाईन नंबर सुरु – मंत्री...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनी ई केवायसी पूर्ण केल्यानंतरही अनेक लाभार्थ्यांना हप्ता न मिळणे, ई केवायसी पूर्ण न...