Thursday, May 14, 2026
Homeक्रीडाIND vs ENG 5th Test : विजयापासून इंग्लंड ३५ धावा दूर; भारताला...

IND vs ENG 5th Test : विजयापासून इंग्लंड ३५ धावा दूर; भारताला ४ विकेटची गरज

पावसाचा खो, निकाल पाचव्या दिवसावर

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

भारत-इंग्लंड (India vs England) पाचवा कसोटी सामना (Test Match) रंगतदार वळणावर आला आहे. इंग्लंडला विजयासाठी ३५ आणि भारताला ४ विकेटसची गरज आहे. इंग्लंडकडून जो रूट (१०५) व हॅरी ब्रूक यांनी (१११) जबाबदारीने खेळत संघाला विजयासमीप पोहोचवले. अशावेळी सामन्यात बेन डकेट आणि यशस्वी जयस्वालची तू-तू मैं-मैं पाहावयास मिळाली. अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील पाचव्या सामन्याचा निकाल आता पाचव्या दिवसावर गेला आहे. चौथ्या दिवसअखेर पावसाने (Rain) हजेरी लावली आणि सामना थांबवावा लागला. परिणामी सामन्याचा निकाल आता पाचव्या दिवशी लागणार आहे.

- Advertisement -

इंग्लंडने दुसऱ्या डावात चांगली कामगिरी केली, पण शेवटच्या टप्प्यात झटपट विकेट गेल्याने संघ अडचणीत आला आहे. इंग्लंडला विजयासाठी ३५ धावांची आवश्यकता आहे तर भारताला विजयासाठी (Won) ४ विकेटची गरज आहे. शेपटाचे फलंदाज असल्याने भारताला तितकीच संधी आहे. भारतीय संघाला सुरुवातीला बेन डकेटने सतावले. त्यामुळे त्याला तंबूचा रस्ता दाखवणे दाखवणे गरजेचे होते. त्याला बाद करण्यासाठी यशस्वी जयस्वालने एक युक्ती लढवली. डकेट त्याच्या जाळ्यात अडकला आणि त्याला तंबूचा रस्ता धरावा लागला.

इंग्लंड संघ दुसऱ्या डावात १७ वे षटक खेळत होता. यात डकेट ३८ धावांवर खेळत होता. तेव्हा जयस्वाल त्याच्याकडे गेला. मी तुझ्या रिव्हर्स स्वीप पाहू इच्छितो. तू बचावात्मक का खेळत आहेत? मोठे फटके मार, असे खेळण्यात काही अर्थ नाही, असे तो म्हणाला. डकेटने त्याचे उत्तर दिले नाही. हळूहळू अर्धशतकापर्यंत पोहोचला. त्यानंतर तो मोठे फटके मारण्यास सरसावला. येथेच त्याने चूक केली आणि विकेट दिली. मात्र, त्याने संघासाठी चांगली कामगिरी केली. इंग्लंडने ८२ धावांवर दुसरी विकेट गमावली.

दोन्ही खेळाडूंची कामगिरी

यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) या कसोटी मालिकेतील ५ सामन्यात ४१.१० च्या सरासरीने ४११ धावा केल्या. त्यात दोन अर्धशतके आणि दोन शतकांचा समावेश आहे. बेन डकेटने ५ सामन्यात ५१.३३ च्या सरासरीने ४६२ धावा केल्या. त्याने या मालिकेत १ शतक आणि ३ अर्धशतके ठोकली. दोन्ही खेळाडूंनी या मालिकेत चांगली कामगिरी केली. पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या डावातही डकेट मोठी धावसंख्या उभारू शकला असता, पण यशस्वी जयस्वालचे डिवचणे मनावर घेतले आणि विकेट फेकली.

ताज्या बातम्या

Nashik MHADA Scam : अधिकाऱ्यांची रवानगी तुरुंगात; काजळे, पाटीलला न्यायालयीन कोठडी

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिकमधील बहुचर्चित म्हाडा जमीन घोटाळ्याप्रकरणी (MHADA Land Scam) गेल्या आठवडाभरापासून पोलीस कोठडीत (Police Custody) असलेल्या दोन बड्या अधिकाऱ्यांची रवानगी आता...