Wednesday, September 9, 2026
Homeमुख्य बातम्याWomen's T20 World Cup 2026 : भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार; ICC कडून महामुकाबल्याची...

Women’s T20 World Cup 2026 : भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार; ICC कडून महामुकाबल्याची तारीख जाहीर

मुंबई | Mumbai

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC Women’s T20 World Cup) आज (बुधवारी) २०२६ साली होणाऱ्या महिलांच्या आयसीसी टी २० वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक (Time Table) जाहीर केले आहे. यामध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना एकाच गटात संधी देण्यात आली आहे. आयसीसी टी २० वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन इंग्लंडमध्ये करण्यात येणार आहे.

- Advertisement -

स्पर्धेचा हा १० वा हंगाम असून, सलामीचा सामना श्रीलंका विरूध्द इंग्लंड (England) क्रिकेट संघांमध्ये खेळविण्यात येणार आहे. हा सामना १२ जून २०२६ रोजी खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये १२ संघ सहभागी होणार असून, आयसीसीकडून १२ संघांची विभागणी २ गटात करण्यात आली आहे. यात पहिल्या गटात पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांचा समावेश आहे. तर दुसऱ्या गटात श्रीलंका, इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज संघांचा समावेश आहे.

दरम्यान, गुणतालिकेत (Point Table) अव्वल ४ मध्ये असणारे संघ उपांत्य फेरीत आपला प्रवेश निश्चित करतील. तर उपांत्य फेरीच्या सामन्यांना ३० जून आणि २ जूलै रोजी सुरुवात होणार आहे. तसेच अंतिम सामना ५ जूलै रोजी खेळविण्यात येणार आहे. तर भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) संघ १४ जून रोजी आमनेसामने येणार आहेत.

भारताचे सामने खालीलप्रमाणे

१४ जून २०२६ पाकिस्तान ऐजबस्टन
१७ जून २०२६ भारत विरुद्ध पात्रता फेरीतील संघ हेडिंगले
२१ जून २०२६ भारत दक्षिण आफ्रिका ओल्ड ट्रॅफर्ड
२५ जून २०२६ भारत विरुद्ध पात्रता फेरीतील संघ ओल्ड ट्रॅफर्ड

ताज्या बातम्या

मनोज

Sanjay Raut: राज्य सरकारला मनोज जरांगेंना मारायचंय…संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले,...

0
मुंबई | Mumbaiमनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा १२ वा दिवस आहे. त्यांनी अंतरवाली सराटी येथे २९ ऑगस्टला उपोषण सुरु केले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती प्रचंड...