Sunday, September 13, 2026
Homeक्रीडाIND vs ENG : भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० मालिका १ जुलैपासून; श्रेयस...

IND vs ENG : भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० मालिका १ जुलैपासून; श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, तीन युवा खेळाडूंचे पदार्पण

मुंबई | Mumbai

आयर्लंडचा यशस्वी दौरा आटोपल्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्ध (India vs England) ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या १ जुलैपासून या हाय-व्होल्टेज मालिकेला प्रारंभ होणार आहे. विशेष म्हणजे, या मालिकेतील पहिला सामना चेस्टर ले स्ट्रीट रिव्हर साईड मैदानावर होणार असून, या ऐतिहासिक मैदानावर भारत आणि इंग्लंड दरम्यानचा हा पहिलाच टी-२० सामना असेल. भारतीय वेळेनुसार रात्री १०:०० वाजता या सामन्यांना सुरुवात होणार असून, याचे थेट प्रक्षेपण सोनी टेन (Sony Ten) वाहिनीवर केले जाईल.

- Advertisement -

नेतृत्वाची धुरा ‘यांच्या’ खांद्यावर

या महत्वपूर्ण मालिकेसाठी भारतीय संघाची (Team India) धुरा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर याच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर दुसरीकडे, यजमान इंग्लंड संघाचे नेतृत्व धडाकेबाज फलंदाज हॅरी ब्रुक करणार आहे.

दुखापतींचे ग्रहण आणि नवोदितांना संधी!

मालिकेपूर्वीच भारतीय संघाला दुखापतींचे मोठे झटके बसले आहेत. संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नितीश कुमार रेड्डी यांनी दुखापतीमुळे मालिकेतून माघार घेतली आहे. परंतु, यामुळे युवा खेळाडूंसाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले आहेत. आयपीएल २०२६ च्या हंगामात आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या वैभव सूर्यवंशी, प्रिन्स यादव आणि सुयांश शेडगे या तीन युवा खेळाडूंना प्रथमच भारतीय संघात पदार्पण करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.

मालिकेतील भारताचे प्रमुख खेळाडू – श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, अर्शदीप सिंग आणि युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी यांच्या कामगिरीवर या मालिकेत सर्वांचे विशेष लक्ष असेल.

आकडेवारीत भारत सरस!

  • भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० इतिहास पाहिल्यास भारतीय संघाचे पारडे थोडे जड दिसते.
  • हेड-टू-हेड रेकॉर्ड: दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यांत भारताने १३-११ अशी आघाडी घेतली आहे.
  • इंग्लंडमधील रेकॉर्ड: इंग्लंडच्या भूमीवर दोन्ही संघांत ११ सामने झाले असून, येथेही भारताने ६-५ असे वर्चस्व राखले आहे.
  • अलीकडील फॉर्म: भारताने खेळलेल्या शेवटच्या ५ टी-२० मालिकांपैकी ३ मालिकांमध्ये विजय मिळवला आहे.

भारत-इंग्लंड टी-२० चे काही रंजक रेकॉर्ड्स

  • सर्वोच्च सांघिक धावसंख्या: भारत (२५३/७) | इंग्लंड (२४६/७)
    अफाट वैयक्तिक खेळी: रोहित शर्मा (१००* नाबाद)
  • मालिकेतील सर्वोत्तम धावसंख्या: विराट कोहली (६४८ धावा) | जोस बटलर (६४४ धावा)
  • कमीतकमी धावसंख्या: इंग्लंड (८० धावा)

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात आतापर्यंत अवघा 22 दिवसच पाऊस

0
अहिल्यानगर | ज्ञानेश दुधाडे | Ahilyanagar नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात पडणार्‍या पावसात 40 दिवसांपेक्षा अधिकचा खंड पडला आहे. जिल्ह्यात जूनपासून आतापर्यंत गेल्या चार महिन्यांत अवघा...