Wednesday, February 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजT20 World Cup : भारतीय संघ सुपर ८ मध्ये; 'या' संघांशी भिडणार

T20 World Cup : भारतीय संघ सुपर ८ मध्ये; ‘या’ संघांशी भिडणार

मुंबई | Mumbai

आयसीसी पुरुष टी २० विश्वचषक (ICC T 20 World Cup) स्पर्धेमध्ये आज (दि.१७) फेब्रुवारी रोजी पाल किल्ले मैदानावर झिंबाब्वे आणि आयर्लंडमध्ये सामना खेळविण्यात येणार होता. भारतीय वेळेनुसार दुपारी ३:०० वाजता सामना सुरू होणार होता. अचानक आलेल्या पावसामुळे (Rain) आणि ओल्या आऊट फील्डमुळे तब्बल सामना सुरू होण्यासाठी प्रतिक्षा करावी लागली.

- Advertisement -

पण, सामना सुरू करण्यासाठी अनुकूल परिस्थिती नसल्यामुळे पंचांनी दोन्ही संघांच्या कर्णधारांशी चर्चा करून आणि सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आयसीसीने सामना अधिकृतपणे रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. यानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सुपर ८ मध्ये कोणत्या तीन संघांचा सामना करणार? हे स्पष्ट झाले आहे.

YouTube video player

भारतीय संघाने सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली पाकिस्तान विरुद्ध १५ फेब्रुवारी रोजी झालेल्या सामन्यात विजय संपादन केला आणि सुपर ८ मध्ये धडक दिली. दरम्यान, भारतीय संघ २२ फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेशी अहमदाबाद येथे तर २६ फेब्रुवारीला झिंबाब्वे विरूध्द चेन्नई आणि १ मार्च रोजी वेस्टइंडिज विरूध्द कोलकाता येथे सामने खेळणार आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : थकबाकीदार असूनही नगरसेवक? शासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शहरातील (City) एका उच्चभ्रू हाऊसिंग सोसायटीत गेल्या दहा वर्षांत लक्षावधीचा मेन्टेनन्स थकवूनही एक महाशय नगरसेवक (Corporator) बँकेचे संचालक म्हणून उजळ...