मुंबई | Mumbai
१९ वर्षांखालील महिलांच्या टी २० विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना आज भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात पार पडला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर नऊ गडी राखून दणदणीत विजय मिळवत विश्वचषकावर (World Cup) नाव कोरले आहे. सानिका चाळकेचा विजयी चौकार आणि भारताने सलग दुसऱ्यांदा हे जेतेपद आपल्या नावे केले आहे.
भारताच्या (India) या अंतिम फेरीतील विजयात फिरकी त्रिकुटाची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. आयसीसी टी-२० विश्वचषकात भारताची सर्वाधिक धावा करणारी फलंदाज गोंगाडी त्रिशा हिने या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली. तिने ४० धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले, याशिवाय तिने गोलंदाजीतही ३ गडी बाद केले. याशिवाय पारूनिका सिसोदिया, वैष्णवी शर्मा आणि आयुषी या फिरकी त्रिकुटाने भारताचा विजय अधिक सोपा केला.
नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी (Batting) करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हा निर्णय भारताच्या गोलंदाजांनी पार चुकीचा ठरवला. भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे आफ्रिकेचा संघ अवघ्या ८२ धावांत गारद झाला.या सामन्यात २३ धावा ही आफ्रिकन फलंदाजांची सर्वात मोठी धावसंख्या होती. दक्षिण आफ्रिकेने पहिल्याच षटकात चांगली सुरूवात केली, पण त्यानंतर त्यांना एकेका धावेसाठी झगडावं लागले. भारताकडून फिरकीपटूंनी ९ विकेट तर वेगवान गोलंदाजाने एकच विकेट घेतली आहे.
दरम्यान, दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाकडून कामालिनी (Kamalini) ही ८ धावा करत बाद झाली. तिला दक्षिण आफ्रिकेची कर्णधार कायला रेनेके बाद करत संघाला एकमेव विकेट मिळवून दिली. तर सानिका आणि गोंगाडी त्रिशा या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी नाबाद ४८ धावांची (Run) विजयी भागीदारी केली. गोंगाडी त्रिशा हीने १३ चेंडूंमध्ये सर्वाधिक ४४ धावांची नाबाद खेळी केली. त्रिशाच्या या खेळीत ८ चौकारांचा समावेश होता. तर सानिकाने ४ चौकारांसह नाबाद २६ धावांची विजयी खेळी साकारली.