मुंबई | Mumbai
इंडियन प्रीमियर लीग २०२६ मध्ये बुधवारी (दि.२०) कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (Mumbai Indians and Kolkata Knight Riders) यांच्यात हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:३० वाजता सुरू होणारा हा सामना घरच्या मैदानावर खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्ससाठी अत्यंत महत्त्वाचा असून, बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी त्यांच्यासाठी ही करो या मरोची लढत असेल. पराभव झाल्यास कोलकाताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.

मुंबई इंडियन्सचा नियमित कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पाठीच्या दुखापतीमुळे आणि उपकर्णधार सूर्यकुमार यादव वैयक्तिक कारणांमुळे पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्याला मुकले होते. मात्र, या महत्त्वाच्या सामन्यात हे दोन्ही स्टार खेळाडू संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या येण्याने मुंबई इंडियन्सची बाजू अधिक भक्कम झाली आहे. मुंबईने आपल्या मागील सामन्यात धर्मशाला येथे पंजाब किंग्जचा पराभव केला होता, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. मुंबईला सलग दुसऱ्या विजयाची संधी, कोलकाता बदल्यासाठी उत्सुक असून याच हंगामात वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबईने कोलकाताचा सहा गडी राखून पराभव केला होता. त्यामुळे कोलकाताला सलग दुसऱ्यांदा पराभूत करण्याची संधी मुंबईकडे असेल.
तर कोलकाता नाईट रायडर्स त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी उत्सुक असेल. दरम्यान, या सामन्याच्या पूर्वसंध्येला मुंबई इंडियन्स संघाला दुहेरी धक्का बसला आहे. डावखुरा सलामीवीर फलंदाज आणि यष्टीरक्षक फलंदाज किंटन डी कॉकने डाव्या मनगटावर झालेल्या टेंडनमध्ये दुखापतीमुळे माघार घेतली आहे. तर राज अंगद बावाने उजव्या अंगठ्याला लिगामेंटला झालेल्या विशेष म्हणजे मुंबई इंडियन्स संघाचे बाद फेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघासाठी ही लढत प्रतिष्ठेची असणार आहे. मुंबई इंडियन्सने अद्याप बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही.
ईडन गार्डन्सवरील काही रंजक नोंदी
- सर्वोच्च धावसंख्या : २०१९ मध्ये याच मैदानावर कोलकाताने मुंबईविरुद्ध २ बाद २३२ धावा केल्या होत्या, जी या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या आहे.
- रोहितचे ऐतिहासिक शतक २०१२ च्या आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळताना रोहित शर्माने येथे नाबाद १०९ धावांची खेळी केली होती. ही या मैदानातील सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे.
- कोलकाताचा शेवटचा विजय कोलकाता नाईट रायडर्सने ११ मे २०२४ रोजी ईडन गार्डन्सवर मुंबईला शेवटचे पराभूत केले होते.
मुंबई इंडियन्सचे पारडे जड
- दोन्ही संघांमधील आजवरचा इतिहास पाहिला तर मुंबई इंडियन्सचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येते.
- एकूण सामने : आयपीएलच्या इतिहासात दोन्ही संघ ३६ वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी २५ सामने मुंबईने तर केवळ ११ सामने कोलकाताने जिंकले आहेत.
- ईडन गार्डन्सवरील रेकॉर्ड या मैदानावर खेळलेल्या ११ सामन्यांपैकी सात सामने मुंबईने तर चार सामने कोलकाताने जिंकले आहेत.
सामन्यातील प्रमुख खेळाडू
सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, फिन अॅलन आणि वरुण चक्रवर्ती या प्रमुख खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल.




