Tuesday, October 6, 2026
Homeक्रीडाIPL 2026 : कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज सामना;...

IPL 2026 : कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज सामना; कोण मारणार बाजी?

नवी दिल्ली | New Delhi

आयपीएल (IPL) स्पर्धेमध्ये आज (गुरुवारी) कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद (Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad) यांच्यात सामना खेळविण्यात येणार आहे. सनरायझर्स हैदराबादचे कर्णधारपद यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनकडे तर कोलकाता नाईट रायडर्स संघाचे कर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे असणार आहे.

- Advertisement -

दोन्ही संघात ईडन गार्डन्स मैदानावर (Eden Gardens Ground) १० सामने खेळले गेले असून, ७-३ शा फरकाने कोलकाता नाईट रायडर्सने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तसेच आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये ३० सामने खेळले असून, यात कोलकाता नाईट रायडर्सने २०-१० फरकाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. अखेरच्या ५ सामन्यांची आकडेवारी पहिल्यास कोलकाता नाईट रायडर्सने ३-२ ने सरशी साधली आहे.

कोलकाता नाईट रायडर्सला अखेरच्या सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध ६ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ६ गडी राखून दणदणीत विजय संपादन करून विजयी सलामी दिली आहे. त्यामुळे विजयी मार्गावर परतण्यासाठी दोन्ही संघ सज्ज असणार आहेत. आजच्या सामन्यात अभिषेक शर्मा, ईशान किशन, फीन अॅलन, सुनील नारायण या प्रमुख खेळाडूंवर लक्ष असणार आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी 369 उमेदवारी अर्ज

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गेल्या महिन्याभरापासून गाजत असलेल्या अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवार (दि. 5) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत 903 अधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज...