Sunday, June 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजIPL 2026 : आयपीएलमध्ये आज डबल हेडर; SRH विरुद्ध LSG दुपारी तर...

IPL 2026 : आयपीएलमध्ये आज डबल हेडर; SRH विरुद्ध LSG दुपारी तर CSK vs RCB सायंकाळी सामना

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

आयपीलमध्ये आज (रविवारी) डबल हेडर सामने होणार आहेत. यात पहिला सामना दुपारी तीन वाजता सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स (Sunrisers Hyderabad and Lucknow Super Giants) तर सायंकाळी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Chennai Super Kings and Royal Challengers Bangalore) यांच्यात सामना होणार आहे.

- Advertisement -

आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये सहा सामने खेळले गेले असून, लखनौ सुपर जायंट्सने ४-२ अशा फरकाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. सनरायझर्स हैदराबादला सलामी सामन्यात बंगळुरूने ६ गडी राखून पराभूत केले होते. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स विरूध्द ईडन गार्डन्सवर रंगलेल्या सामन्यात ६५ धावांनी दणदणीत विजय संपादन करून सनरायझर्स हैदराबादने आयपीएलमध्ये आपला पहिला विजय संपादन केला आहे. सनरायझर्स हैदराबाद ने हैदराबाद येथे ५८ सामने खेळले असून,३६ सामन्यात विजय संपादन केला आहे. तर २१ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

दरम्यान, दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात एम चिन्नास्वामी मैदानावर होणार आहे. या मैदानावर ११ सामने खेळले असून,दोन्ही संघांनी ५-५ विजय संपादन केले आहेत. आयपीएल २०२५ मध्ये दोन्ही संघांमध्ये साखळी फेरीत २ सामने खेळले गेले होते. यात दोन्ही सामन्यात बंगळूरु संघाने विजय संपादन केला होता. आजच्या सामन्यात विराट कोहली, रजत पाटीदार, संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड या प्रमुख खेळाडूंवर नजर असणार आहे.

ताज्या बातम्या

चिमुकल्यांच्या स्वागतासाठी प्रशासकीय अधिकारी उद्या शाळांमध्ये

0
नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik उन्हाळी सुटीच्या आनंदी आठवणींची शिदोरी घेऊन चिमुकली पावले पुन्हा एकदा ज्ञानमंदिराच्या उंबरठ्यावर सोमवारपासून येणार आहेत. या नव्या शैक्षणिक पर्वाच्या मंगल...