Thursday, September 10, 2026
Homeक्रीडाIND vs ENG 4th Test : मँचेस्टरमध्ये आजपासून चौथी कसोटी; भारतीय संघाचा...

IND vs ENG 4th Test : मँचेस्टरमध्ये आजपासून चौथी कसोटी; भारतीय संघाचा विजयाचा मार्ग खडतर

इंग्लंड संघात मोठे बदल

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

शुभमन गिलच्या (Shubhman Gill) नेतृत्वात भारतीय संघ (India Team) इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. इंग्लंड विरुद्धची चौथी कसोटी उद्या मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डवर सुरू होणार आहे. भारताचा या कसोटीत (Test) विजय मिळवून मालिकेत २-२ अशी बरोबरी करण्याचा प्रयत्न असेल, शुभमन गिलच्या नेतृत्वातील भारतीय संघाला खेळाडू जखमी असल्याने धक्के बसले आहेत. नितीशकुमार रेड्डी, अर्शदीप सिंग आणि आकाशदीप हे दुखापतग्रस्त झाल्याने चौथ्या कसोटीतून बाहेर गेले आहेत.

- Advertisement -

मँचेस्टर कसोटीत भारतीय संघापुढे इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरपेक्षा वेगवान गोलंदाज खिस वोक्स याचा धोका असेल. ख्रिस बोक्स याची या मैदानावरील (Ground) कामगिरी फलंदाजांना धडकी भरवणारी आहे. भारतीय संघ मँचेस्टर कसोटीमध्ये विजय मिळवून जुना इतिहास पुसण्याचा प्रयत्न करेल. भारत सध्या मालिकेत १-२ ने पिछाडीवर आहे. भारताने या मालिकेत बर्मिंघम कसोटीत विजय मिळवला होता. त्या मैदानावर भारताने त्यापूर्वी विजय मिळवलेला नव्हता. त्याच प्रकारची कामगिरी शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघाला मँचेस्टर कसोटीत करावी लागेल. मँचेस्टर कसोटीत विजय मिळवणे भारतासाठी आव्हानात्मक असेल.

लियाम डॉसनला संधी

इंग्लंडने चौथ्या कसोटीसाठी संघात बदल केला आहे. भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडने शोएब बशीरच्या जागेवर लियाम डॉसन याला संधी दिली आहे. शोएब बशीर दुखापतग्रस्त झाल्याने संघाबाहेर गेला आहे. लियाम डॉसनने भारताविरुद्ध पदार्पण केले होते. मात्र, बराच काळ तो संघाबाहेर होता. मँचेस्टर कसोटीत भारतापुढे इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरपेक्षा धोका वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स याचा असेल, ख्रिस वोक्स याची या मैदानावरील कामगिरी फलंदाजांना धडकी भरवणारी आहे.

या मैदानावर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ख्रिस वोक्स चौथ्या स्थानावर आहे. जेमी स्मिथ आणि हॅरी ब्रूक यांनी आतापर्यंत भारताविरुद्ध खेळलेल्या तीन सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. दोन्ही खेळाडूंनी इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. जेमीने तीन सामन्यांच्या सहा डावात १०३.७५ च्या सरासरीने ४१५ धावा केल्या आहेत, तर ब्रूकने तीन सामन्यांच्या सहा डावात ५२.३३ च्या सरासरीने ३१४ धावा केल्या आहेत. चौथ्या कसोटी सामन्यात सर्वांच्या नजरा या दोन्ही खेळाडूंवर असतील. इंग्लंडला स्मिथ आणि ब्रूककडून खूप अपेक्षा असतील.

कंबोजला कसोटी पदार्पणाची संधी

मँचेस्टरच्या मैदानातील कसोटी आधी शुभमन गिलने पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्याने संघात लेट एन्ट्री झालेल्या अंशुल कंबोज याला कसोटी पदार्पणाची संधी मिळणार असल्याचे संकेत दिले आहेत. या सामन्यासाठी आकाशदीपच्या जागेवर त्याला तिसरा गोलंदाज कोण असेल? यावर कर्णधाराने अंशुल कंबोज किंवा प्रसिद्ध कृष्णा या दोघांपैकी एकाला संधी मिळणार असल्याचे सांगितले. या सामन्यात रिषभपंत खेळणार असून तो फिट असल्याचे शुभमन गिलने म्हटले आहे. त्यामुळेच तोच विकेटकिपर बॅटस्मनच्या रूपात संघात दिसेल, हे आता स्पष्ट झाले आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : सिंहस्थ महाकुंभ गणेश मंडळ स्पर्धेच्या नोंदणीला मुदतवाढ; ‘या’...

0
नाशिक | Nashik आगामी सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७चा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत (Citizen) पोहोचविण्यासोबतच नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरातील गणेश मंडळांचा (Ganesh Mandal) व्यापक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा...