Sunday, April 12, 2026
Homeक्रीडाIND vs AUS 3rd T20 : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज निर्णायक टी २०...

IND vs AUS 3rd T20 : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज निर्णायक टी २० सामना

नवी दिल्ली | New Delhi

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात ५ टी २० सामन्यांची मालिका खेळविण्यात येत आहे. या मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाने मेलबर्नमध्ये पार पडलेल्या दुसऱ्या टी २० सामन्यात भारतीय संघाचा ४ गडी राखून पराभव करत १-० ने विजयी आघाडी घेतली आहे. यानंतर तिसरा आणि निर्णायक सामना आज (रविवारी) होबार्ट येथील बेलेरीव ओव्हल स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी १:४५ वाजता खेळविण्यात येणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि जिओ हॉस्टस्टार वर करण्यात येणार आहे.

- Advertisement -

भारतीय संघासाठी (Team India) ही लढत अतिशय महत्वाची असणार आहे. तिसऱ्या सामन्यात विजय संपादन करून मालिकेत बरोबरी साधण्याची संधी भारताकडे असणार आहे.तर भारताला सलग दुसऱ्यांदा पराभूत करून आपली विजयी आघाडी अधिक भक्कम करण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असणार आहे. भारतीय संघाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे तर मिचेल मार्शकडे ऑस्ट्रेलियाची धुरा असणार आहे.विशेष म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलिया होबार्ट येथील बेलेरीव ओव्हल स्टेडियमवर प्रथमच टी २० सामना खेळणार आहे.

होबार्ट मैदानावरील रेकॉर्ड्स

या मैदानावर सर्वाधिक धावा झिंबाब्वेच्या सिकंदर रझाने केले आहे. यात चार सामन्यात १३६ धावा असून, सर्वाधिक स्कोर ८२ इतका आहे. तर एक अर्धशतकाचा देखील समावेश आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने ४ सामन्यात १३३ धावा केल्या असून,त्याच्या सर्वाधिक धावा १०३ इतक्या आहेत. यात एका शतकाचाही समावेश आहे. वेस्टइंडिजच्या अलझारी जोसेफ या मैदानावर सर्वाधिक ८ बळी घेतले आहेत. तर नीचांकी धावसंख्या ही पाकिस्तानची ११७ एवढी आहे. तसेच ऑस्ट्रेलियाच्या २१३ या सर्वाधिक धावा आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : ‘भाईगिरी’ एडिट करणं महागात; चार ‘रीलबाजांना’ गंगापूर...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik सोशल मीडियावर (Social Media) प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि स्वतःची दहशत निर्माण करण्यासाठी 'रिल' बनवण्याचे वेड सध्या टवाळखोरांसह काही तरुणाईच्या अंगाशी येत...