Wednesday, May 20, 2026
Homeक्रीडाIPL 2026 : आयपीएलमध्ये आज डबल हेडर; पहिल्या सामन्यात GT vs LSG...

IPL 2026 : आयपीएलमध्ये आज डबल हेडर; पहिल्या सामन्यात GT vs LSG भिडणार, दुसरा कुणामध्ये?

मुंबई | Mumbai

आयपीएलमध्ये आज (रविवारी) दोन सामने होणार असून, पहिला सामना गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स (Gujarat Titans and Lucknow Super Giants) यांच्यात लखनौ येथील अटल बिहारी वाजपेयी एकाना मैदानावर पार पडणार आहे.तर दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Mumbai Indians and Royal Challengers Bangalore) यांच्यात वानखेडे मैदानावर होणार आहे.

- Advertisement -

दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध नवी दिल्ली (Delhi) येथे पार पडलेल्या सामन्यात १ धावाने रोमहर्षक विजय संपादन करून गुजरात टायटन्सने गुणतालिकेत आपला पहिला विजय संपादन केला आहे. त्यानंतर आता लखनौ सुपर जायंट्सला पराभूत करून आपला दुसरा विजय संपादन करण्याची संधी गुजरातकडे असणार आहे. दुसरीकडे लखनौ सुपर जायंट्स संघाला सलामी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पराभूत केले होते. मात्र कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध विजय संपादन केल्यामुळे लखनौच्या संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे.आयपीएल स्पर्धेमध्ये दोन्ही संघांमध्ये ७ सामने खेळले गेले असून, ‌गुजरात टायटन्सने ४-३ फरकाने सरशी साधली आहे. तर एकाना मैदानावर २ सामने खेळले असून, दोन्ही संघांनी १-१ असा विजय संपादन केला आहे.

तर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये आयपीएल स्पर्धेत ३४ सामने खेळविण्यात आले असून, मुंबई इंडियन्सने १९-१५ आशा फरकाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तसेच वानखेडे स्टेडियमवर ११ सामने खेळले असून, मुंबई इंडियन्स ८-३ ने वरचढ ठरला आहे. यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियमवर १ सामना खेळला असून, कोलकाता नाईट रायडर्स संघाला पराभूत केले आहे. दोन्ही संघांमध्ये पार पडून गेलेल्या अखेरच्या ५ सामन्यांचा निकाल पाहिल्यास बंगळुरूने ३-२ ने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आयपीएल २०२५ मध्ये दोन्ही संघांमध्ये अखेरचा सामना खेळला गेला होता. या सामन्यात बंगळूरुने १२ धावांनी विजय (Won) संपादन केला होता.

ताज्या बातम्या

Onion : कांदा दर घसरणीची केंद्राकडून गंभीर दखल; उच्चस्तरीय केंद्रीय पथक...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik विक्रमी उत्पादनानंतर कांद्याचे दर अक्षरशः कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना अखेर केंद्र सरकारने या परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे. ग्राहक...