Wednesday, June 10, 2026
Homeमुख्य बातम्याSA vs NZ Semi Final : आज पहिला उपांत्य सामना; दक्षिण आफ्रिकेचे...

SA vs NZ Semi Final : आज पहिला उपांत्य सामना; दक्षिण आफ्रिकेचे पारडे जड, पण न्यूझीलंड ‘बदला’ घेण्यासाठी सज्ज

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये (ICC T 20 World Cup) बुधवारी (दि.४) कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड संघांमध्ये (South Africa and New Zealand) उपांत्य सामना खेळवण्यात येणार आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७.०० वाजता सामना खेळविण्यात येणार आहे.

- Advertisement -

न्यूझीलंड संघाचे कर्णधारपद अष्टपैलू मिचेल सँटनरकडे तर दक्षिण आफ्रिका संघाचे कर्णधारपद अॅडम मार्करमकडे असणार आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये दोन्ही संघांमध्ये ५ सामने खेळले गेले असून, दक्षिण आफ्रिकेने ५-० ने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तसेच टी-२० क्रिकेटमध्ये १९ सामने (Match) खेळले असून, दक्षिण आफ्रिकाने १२-७ फरकाने आपला दबदबा निर्माण केला आहे.

टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये अहमदाबाद येथील श्री नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या साखळी फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंड संघाला ७ गडी राखून पराभूत केले होते. या पराभवाची परतफेड करण्यासाठी न्यूझीलंड सज्ज असणार आहे. विशेष म्हणजे कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर दोन्ही संघ यंदाच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये प्रथमच सामना खेळणार असल्यामुळे सर्व क्रिकेट चाहत्यांचे या सामन्यावर प्यावर आवर्जून लक्ष असेल.

दक्षिण आफ्रिका संघाला विश्वचषक स्पर्धेमध्ये आपली दुसरी अंतिम फेरी गाठण्याची संधी असणार आहे. तर न्यूझीलंड संघाला दुसर्‍यांदा अंतिम फेरीत खेळण्याची संधी असणार आहे. दक्षिण आफ्रिका विरूध्द भारत (India) यांच्यामध्ये बार्बाडोस येथे २०२४ मध्ये रंगलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाचा ७ धावांनी पराभव झाला होता. तसेच २०२१ मध्ये दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर न्यूझीलंड संघाला ऑस्ट्रेलियाने पराभूत करून विश्वचषक स्पर्धेवर आपले नाव कोरले होते.

सामना अधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा

दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड

मैदानावरील पंच : रिचर्ड इलिंग वर्थ आणि अॅलेक्स वॉफ
तिसरे पंच : नितिन मेनन। चौथे पंच: रॉड टकर
सामना अधिकारी : जवागल श्रीनाथ

भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा उपांत्य सामना

मैदानावरील पंच : अल्लाउद्दीन पालेकर, क्रिस गॅफनी
तिसरे पंच : अॅडरियन होल्ड स्टॉक। चौथे पंच पॉल रायफल
सामना अधिकारी : अँडी पाय क्रॉफ्ट

या खेळाडूंवर असेल नजर – अॅडम मार्करम, क्विंटन डिकॉक, मार्को यानसेन, डॅरेल मिचेल, मिचेल सँटनर

ताज्या बातम्या

सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी गोदावरी प्रदूषणमुक्त करावी : हेमंतदास महाराज

0
पंचवटी | प्रतिनिधी Panchavati आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेत गोदावरी नदी पूर्णपणे प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी...