Tuesday, January 6, 2026
Homeक्रीडाIND vs NZ : न्यूझीलंडने रचला इतिहास; भारताचा लाजिरवाणा पराभव, मालिका ३-०...

IND vs NZ : न्यूझीलंडने रचला इतिहास; भारताचा लाजिरवाणा पराभव, मालिका ३-० ने जिंकली

मुंबई | Mumbai

भारत आणि न्यूझीलंड (India and New Zealand) यांच्यात मुंबईतील वानखेडे मैदानावर झालेल्या तिसर्‍या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारताचा (India) २५ धावांनी पराभव केला आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडने भारताला आपल्याच देशात व्हाईटवॉश दिला आहे. त्यामुळे भारतात ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्व सामने गमविण्याची ही भारतीय संघाची पहिलीच वेळ आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : “…तर तुमचा बाबा सिद्दिकी करू”; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

YouTube video player

न्यूझीलंडने भारतासमोर दुसऱ्या डावात १४७ धावांचे लक्ष्य ठेवले होते, ज्याचा पाठलाग भारतीय संघ (Team India) करू शकला नाही. वानखेडेवर (Wankhede) एजाज पटेल आणि ग्लेन फिलिप्स यांच्या धोकादायक गोलंदाजीसमोर एकही भारतीय फलंदाज टिकू शकला नाही. त्यामुळे अवघ्या १२१ धावांत संपूर्ण भारतीय संघ तंबूत परतला. भारतात पहिल्यांदाच न्यूझीलंडसंघाने कसोटी मालिका जिंकली आहे.

हे देखील वाचा : Maharashtra News : निवडणुकीच्या तोंडावर राज्यात पैशांचा महापूर; नाशिक, कसारा घाटात नाकेबंदीत दोन कोटी ३१ लाखांची रोकड हस्तगत

दरम्यान, दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करतांना भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली होती. मात्र, ऋषभ पंतने भारतीय फलंदाजीची धुरा सांभाळत ६४ धावांचे शानदार अर्धशतक झळकावले. तर रोहित शर्मा (११), शुभमन गिल (०१), विराट कोहली (०१), यशस्वी जैस्वाल (०५) आणि सर्फराज खान (०१) पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यामुळे अखेरीस हतबल झालेल्या भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Maharashtra News : प्रदूषण नियंत्रण मंडळाला उच्च न्यायालयाचा झटका; ‘या’ सुविधेवर...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी) उच्च न्यायालयाने (High Court) झटका दिला . एमपीसीबीला धोकादायक आणि इतर कचरा (व्यवस्थापन...