Sunday, June 14, 2026
Homeक्रीडाManikrao Kokate : रात गई बात गई, नवी इनिंग जोरदार खेळणार -...

Manikrao Kokate : रात गई बात गई, नवी इनिंग जोरदार खेळणार – क्रीडामंत्री कोकाटे

जळगाव | Jalgaon

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon Season) राष्ट्रवादी (अ.प) पक्षाचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी गेम खेळतानाचा व्हिडीओ समोर आला होता. यावरून कोकाटे चांगलेच अडचणीत सापडले होते. त्यानतंर माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शेतकरी आणि विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. शेवटी कोकाटे यांना कृषिमंत्रीपदावरून हटविण्यात आले होते.

- Advertisement -

यानंतर त्यांच्याकडे मंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडे असलेल्या क्रीडा आणि युवक कल्याण विभागाची धुरा सोपविण्यात आली. मात्र, कोकाटे हे या प्रकरणामुळे राज्यभर चांगलेच चर्चेत आले. त्यानंतर आज (रविवारी) जळगाव दौऱ्यावर (Jalgaon tour) असताना मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ‘आपण नवी इनिंग जोरदार खेळणार’, असल्याचे विधान केले आहे. त्यांचे हे विधान आता चर्चेत आले आहे.

मंत्री माणिकराव कोकाटे यांना माध्यम प्रतिनिधींनी ‘आपल्यावर कृषीमंत्री असताना विरोधकांनी टीका केली होती’, असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देतांना कोकाटे म्हणाले की, “रात गई बात गई. ज्या गोष्टी होऊन गेल्या त्याबद्दल आता बोलण्यात काही अर्थ नाही. लोकांना आपल्याला कसा न्याय देता येईल, त्या संदर्भात बोलू. मागे काय झाले त्याच्या खोलात जाण्याची आवश्यकता नसून, पुढच्या वाटचालीवर लक्ष केंद्रित करत आहोत”, असे त्यांनी म्हटले.

पुढे कोकाटे यांना माध्यम प्रतिनिधींनी “आपल्याकडे आता क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी आली आहे. क्रीडा क्षेत्रातील समस्या आपण कशा सोडवणार? आपली नवी इनिंग कशी असणार? असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देतांना कोकाटे म्हणाले की, “नवी इनिंग जोरदार खेळणार आहे. तुम्ही काळजी करू नका, एकदम जोरदार खेळणार, असे त्यांनी म्हटले.

तसेच “आगामी निवडणुकीच्या (Local Body Election) रणनीतीबाबत बोलताना कोकाटे म्हणाले की, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अपक्ष लढायच्या की युतीत, याचा अंतिम निर्णय पक्ष नेतृत्व घेईल”, असे त्यांनी म्हटले. तसेच भाजप नेते गिरीश महाजन यांनी ‘स्वबळा’चे संकेत दिले असता त्यावर बोलतांना कोकाटे म्हणाले की, “त्यांनी (गिरीश महाजन) त्यांच्या पक्षाच्या धोरणाचा विचार करावा. आमच्या निवडणुका स्वबळावर की महायुतीत लढायच्या, हा निर्णय आमचे नेते एकत्र बसूनच घेतील, असेही कोकाटे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

चिमुकल्यांच्या स्वागतासाठी प्रशासकीय अधिकारी उद्या शाळांमध्ये

0
नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik उन्हाळी सुटीच्या आनंदी आठवणींची शिदोरी घेऊन चिमुकली पावले पुन्हा एकदा ज्ञानमंदिराच्या उंबरठ्यावर सोमवारपासून येणार आहेत. या नव्या शैक्षणिक पर्वाच्या मंगल...