Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजWomens Chess World Cup Final : महाराष्ट्राची लेक दिव्या देशमुख ठरली बुद्धिबळाची...

Womens Chess World Cup Final : महाराष्ट्राची लेक दिव्या देशमुख ठरली बुद्धिबळाची जगज्जेती; १९ व्या वर्षी रचला इतिहास

मुंबई | Mumbai

महिलांच्या चेस वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामन्यात महाराष्ट्रातील नागपूरच्या दिव्या देशमुखने (Divya Deshmukh) बाजी मारली आहे. त्यामुळे ती फिडे चेसची जगज्जेती ठरली आहे. या सामन्याचे दोन राऊंड झाले. यातील दुसऱ्या राऊंडमध्ये दिव्याने ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीवर विजय मिळविला. दिव्या देशमुख ही अतिशय शांत आणि संयमी खेळाडू आहे. तिच्या चाली आक्रमक असून, तिने खेळलेली चाल भल्याभल्या दिग्गज खेळाडूंना मात देण्यासाठी पुरेशी ठरली आहे.

- Advertisement -

यानंतर आज (सोमवार) तिने पुन्हा एकदा तिची चलाखी सिद्ध केली आहे. दिव्याचे वडील डॉ.जितेंद्र देशमुख हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयत कार्यरत आहेत. तर आई डॉ. नम्रता यादेखील खासगी क्‍लिनिक चालवत होत्या. दिव्याच्या आई – वडिलांचा खेळाशी संबंध नाही. मात्र, आपल्या मुलींनी मैदानावर जावं, अशी त्यांची खूप इच्छा होती. मोठ्या मुलीला बॅडमिंटनचे तर दिव्याला बुद्धिबळाचे प्रशिक्षण वर्ग लावले. दिव्या वयाच्या पाचव्या वर्षापासून बुद्धिबळात (Chess) रमली आहे.

YouTube video player

दरम्यान, दिव्या देशमुखने आतापर्यंत जगभरातील विविध स्पर्धांमध्ये २५ सुवर्ण, ६ रौप्य आणि ४ कास्य पदके जिंकली आहेत. बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये तिच्या नावावर सुवर्ण आणि कांस्यपदक आहे. ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियन आणि तीन वेळा आशियाई विजेती असलेल्या दिव्याने आंतरराष्ट्रीय मास्टर नॉर्मससह बुद्धिबळातील सर्वाधिक प्रतिष्ठेचा महिला ग्रॅण्डमास्टर किताब सुद्धा पटकावला आहे. बुद्धिबळातील या अद्वितीय कामगिरी आणि योगदानाबद्दल राज्य सरकारने दिव्याला दोन वर्षांपूर्वी शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने (Award) सन्मानित केले आहे.

दिव्याला किती पैसे मिळाले?

महिलांच्या बुद्धिबळचा अंतिम सामना जिंकणाऱ्या दिव्या देशमुखला विजेतेपदाबरोबरच सुमारे ४२ लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे. तर उपविजेती कोनेरू हम्पी हिला सुमारे ३० लाख रुपये मिळाले आहेत. या दोन्ही खेळाडूंनी बुद्धिबळातील अत्यंत प्रतिष्ठेच्या कँडिडेट्स टूर्नामेंटसाठी पात्रता मिळवली आहे, जे विश्वविजेतेपदाच्या दिशेने एक मोठं पाऊल मानले जाते. भारतामध्ये बुद्धिबळाचे क्रेझ वेगाने वाढत आहे, आणि त्यामुळे या दोघींनाही नवीन स्पॉन्सर्स, ब्रँड डील्स आणि व्यावसायिक संधी मिळण्याची शक्यता प्रचंड आहे.

ताज्या बातम्या

शरद

Sharad Pawar: “त्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे?” विलिनीकरणाच्या चर्चांवर शरद पवारांनी...

0
बारामती | Baramatiराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर वेगवेगळ दावे करण्यात येत आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनि‍करणाबाबत दिवंगत अजितदादा पवार...