नवी दिल्ली | New Delhi
करोडो जगभरातील क्रीडाप्रेमीचे लक्ष लागून राहिलेली फिफा विश्वचषक २०२६ फुटबॉल (FIFA World Cup 2026) स्पर्धा आज (दि.११) पासून अधिकृतपणे सुरू होत आहे. अमेरिका, मेक्सिको आणि केनडा या तीन देशांच्या संयुक्त यजमानपदाखाली आयोजित केला जाणारा हा आजवरच्या इतिहासातील (History) सर्वात मोठा फुटबॉल विश्वचषक ठरणार आहे. फुटबॉलच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल ४८ संघ या महाकुंभात आमनेसामने येतील.
३९ दिवस चालणार्या या भव्य क्रीडा स्पर्धेत (Sports Competition) एकूण १०४ सामने खेळवले जाणार असून, तीन देशांतील १६ अत्याधुनिक स्टेडियम्सवर हा थरार रंगणार आहे. यापूर्वी २००२ मध्ये जपान आणि दक्षिण कोरियाने संयुक्तपणे विश्वचषकाचे यजमानपद भूषवले होते, मात्र तीन देशांनी मिळून विश्वचषक आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
आकड्यांच्या नजरेतून विश्वचषक २०२६
४८ संघ आणि ९,२४८ खेळाडू : या स्पर्धेत विक्रमी १,२४८ खेळाडूंचा समावेश असून, जे ७१ देशांतील ४७२ देशांतर्गत क्लबमधून आले आहेत.
अनुभवी विरुद्ध नवखे : यातील ३५० खेळाडू यापूर्वी विश्वचषक खेळले आहेत, तर ८९५ खेळाडू पहिल्यांदाच या जागतिक मंचावर आपले पदार्पण करणार आहेत.
क्लबचा दबदबा : मँचेस्टर सिटीचे सर्वाधिक १९ खेळाडू या विश्वचषकात खेळताना दिसतील. त्यापाठोपाठ बायर्न म्युनिक (१५), पेरिस सेंट जर्मेन (१५), आर्सेनल (१५) आमि बार्सिलोना (१४) या क्लबच्या खेळाडूंचा क्रमांक लागतो.
देशांचा वाटा : इंग्लंडमधील क्लबमधून खेळणारे सर्वाधिक २०० खेळाडू या विश्वचषकात आपले कौशल्य दाखवतील. त्याखालोखाल जर्मनी (१०९), फ्रान्स (८३), स्पेन (८३), इटली (७५) आणि सौदी अरेबिया (४९) याचा क्रमांक लागतो.
ऐतिहासिक विक्रम आणि रंजक तथ्ये
१. मोडीत निघणार का क्लोजचा विक्रम?
जर्मनीच्या मिरोस्लाव क्लोजचा विश्वचषकातील १६ गोल्सचा ऐतिहासिक विक्रम यंदा मोडीत निघण्याची शक्यता आहे. लिओनेल मेस्सी १३ गोल्ससह शर्यतीत आहे. तर फ्रान्सचा किलियन एम्बाप्पे अवघ्या दोन विश्वचषकात १२ गोल करून या विक्रमाच्या अगदी जवळ पोहोचला आहे.
२. चार देशांचे ऐतिहासिक पदार्पण
यंदाच्या विश्वचषकात काबी व्हडे, कुराकाओं, जॉर्डन आणि उझबेकिस्तान हे चार देश पहिल्यांदाच भाग घेत आहेत. यामुळे विश्वचषक खेळणाऱ्या देशांची एकूण संख्या आाता ८४ वर पोहोचली आहे.
३. वयातील २५ वर्षांचे अंतर
या स्पर्धेतील सर्वात वयस्कर आणि सर्वात तरुण खेळाडूमध्ये २५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे अंतर आहे. स्कॉटलंडचा गोलकीपर क्रेग गॉर्डन स्पर्धेच्या पहिल्या दिवशी ४३ वर्षे १६२ दिवसांचा असेल, तर मेक्सिकोचा गिल्बर्ट मीरा अवघ्या १७ वर्ष २४० दिवसांचा आहे.
४. ब्राझील एकमेव सदाबहार देश
१९३० मध्ये उरुगों येथून सुरु झालेल्या पहिल्या विश्वचषकापासून आतापर्यंतच्या सर्व २२ विश्वचषकांमध्ये भाग घेणारा ब्राझील हा एकमेव देश आहे. ब्राझीलने ७६ विजय, २३७ गोल आणि सर्वाधिक ५ चोळा विजेतेपद पटकावून आपले वर्चस्व राखले आहे.
५. फ्रान्सचा सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत जाण्याचा प्रयत्न
२०१८ चा विजेता आणि २०२२ चा उपविजेता असलेला फ्रान्सचा संघ सलग तीन वेळा अंतिम फेरीत पोहोचणारा इतिहास रचण्यासाठी मैदानात उतरेल. यापूर्वी केनिया, इटली आणि ब्राझील यांनीच सलग दोनदा चॅम्पियन बनण्याचा बहुमान मिळवला आहे.




