Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रइयत्ता दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; पहा एका क्लीकवर

इयत्ता दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; पहा एका क्लीकवर

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक (SSC, HSC Supplementary Exam Time Table) जाहीर करण्यात आले आहे.

- Advertisement -

या वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा २२ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत होईल. त्याचप्रमाणे बारावीची परीक्षा १६ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. व्यवसाय अभ्यासक्रम घेऊन बारावीची परीक्षा १६ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत होईल. तत्पूर्वी, दहावीची प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा २१ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत होईल. बारावीची प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा १५ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करून, अंतर्गत मूल्यांकनाद्वारे निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, या निकालातही अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. त्यामुळे या विद्यार्थ्यांची आता नियमित लेखी परीक्षा होणार आहे. त्याचबरोबर अंतर्गत मुल्यमापन पद्धतीने मिळालेल्या गुणांवर समाधानी नसलेल्या विद्यार्थ्यांनाही ही परीक्षा देता येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या