Friday, November 15, 2024
Homeब्रेकिंग न्यूजST Bus Strike : ऐन सणासुदीत ‘लाल परी’ची चाके थांबली, प्रवाशांना मोठा...

ST Bus Strike : ऐन सणासुदीत ‘लाल परी’ची चाके थांबली, प्रवाशांना मोठा फटका

मुंबई | Mumbai

ऐन सणासुदीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Bus Strike) आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला आहे.

- Advertisement -

राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी संघटनेकडून सेवा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यासोबतच आर्थिक बाबी, खासगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी मान्य करा, असा इशाराही एसटी कर्मचारी संघटनेने दिला आहे.

हे ही वाचा : लग्नासाठी घरात घुसून अल्पवयीन मुलीला विवस्त्र केले

एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. राज्यभरातील एकाही जिल्ह्यातील एसटी बस डेपोमधून एकही बस सोडण्यात आलेली नाही. हा संप केव्हापर्यंत सुरू राहील याबाबतही साशंकता आहे. या संपामुळे एसटीला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

हे ही वाचा : “सख्ख्या बहिणी पक्क्या वैरी”! वनराज आंदेकरच्या हत्येत मोठा ट्विस्ट

तसेच, अकरा एसटी कामगार संघटनाच्या कृती समितीने आज राज्यभरात आंदोलन पुकारलं आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर संप पुकारल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. कृती समितीतर्फे शासनाला मागण्या मान्य करण्यासाठी दोन सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीत मागण्या मान्य न केल्यास ३ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला होता.

हे ही वाचा : धक्कादायक! IPS अधिकाऱ्याच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू, विद्यापीठाच्या वसतिगृहात आढळला मृतदेह

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या