Monday, July 1, 2024
Homeनगरएसटीवर दगडफेक करत काचा फोडल्या

एसटीवर दगडफेक करत काचा फोडल्या

एसटीतून खाली उतर म्हटल्याने टवाळखोर तरुणांचे कृत्य

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

- Advertisement -

एसटीत टवाळ्या करणार्‍या युवकांना एसटीमधून खाली उतर म्हणाल्याचा राग आल्यामुळे चार ते पाच टवाळखोर तरुणांनी प्रवाश्यांनी भरलेल्या एसटी वर दगडाने हल्ला करत काचा फोडल्या, लाकडी दांडक्याने एसटीच्या दारावर मारत एसटीच्या चालक वाहकाला धमकावल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी गावात आज (दि.26) दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. प्रवाशांनी भरलेल्या एसटीवर अचानक अशी दगडफेक झाल्यामुळे प्रवाशी घाबरले होते. सुदैवाने यात कुणाला इजा झाली नाही. सदर घटनेबाबात रात्री उशिरा तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेबाबत एसटी चालक वाहक यांच्याकडून समजलेली माहिती अशी, आज श्रीगोंदा डेपोची श्रीगोंदा-स्वारगेट एसटी पुण्यावरून श्रीगोंद्याकडे येत असताना वरवंड याठिकाणी एसटीमध्ये महाविद्यालयीन तरुणी चढल्या.

त्यांच्या मागे काही तरुण चढले. यावेळी एक तरुण दरवाजात उभा होता. त्याला एसटी वाहकाने दरवाज्यातून पुढे हो असे सांगितले त्यावरून वाहक व त्या तरुणात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी एसटीच्या चालकांनी वाद वाढायला नको म्हणून सदर तरुणाला खाली उतर मागच्या एसटीने ये असे सांगितले. त्यानंतर तो तरुण खाली उतरला परंतु एसटी जेव्हा काष्टी याठिकाणी आली तेव्हा तो तरुण त्याच्या चार साथीदारांसह दोन दुचाकीवर एसटीचा पाठलाग करत आले. काष्टी याठिकाणी श्रीगोंदा चौकात ही एसटी थांबली असता हातात हॉकी स्टिक घेऊन आलेल्या तरुणांनी अचानक एसटीवर हल्ला चढवला.एसटीचा दरवाजा उघडण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

परंतु त्यांना दरवाजा उघडला नाही. त्यानंतर त्यांनी चालकाच्या दरवाज्यावर हॉकी स्टिकने मारत दरवाजा उघडण्यास सांगितले. परंतु चालकाने दरवाजा न उघडल्यामुळे या तरुणांनी एसटीच्या समोरच्या बाजूने दगडफेक केली. यात एसटीचे मोठे नुकसान झाले. आगार प्रमुख यांनी पोलीस अधिकारी यांची भेट घेतली. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या