Wednesday, January 7, 2026
Homeनगरबस प्रवासात महिलेच्या बॅगेतून 13 लाखांचे दागिने लंपास

बस प्रवासात महिलेच्या बॅगेतून 13 लाखांचे दागिने लंपास

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पाथर्डी ते करंजी (Karanji) दरम्यान एसटी बसने पुण्याकडे जाणार्‍या एका महिला प्रवाशाच्या (Female Passenger) बॅगेतून अज्ञात चोरट्याने तब्बल 13 लाख रुपये किमतीचे 132.21 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरल्याची (Gold Jewelry Theft) धक्कादायक घटना सोमवारी (दि.26) घडली. या घटनेने पाथर्डी बसस्थानक (Pathardi Bus Stand) चोरीचे हॉटस्पॉट बनल्याची चर्चा आहे. प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांच्या ढिसाळ कारवाईवर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

- Advertisement -

पंचफुला मोहन जाधव (वय 55, कोळसांगवी, ता. पाथर्डी) या महिला बहीणच्या मुलाच्या लग्नासाठी गावी आल्या होत्या. 26 मे ला सकाळी 10:45 वाजता त्या पाथर्डी नवीन बसस्थानकावरून पुण्याला जाणार्‍या एस.टी. बसमध्ये बसल्या. बॅगेत ठेवलेले दागिने सुरक्षित असल्याची खात्री करून त्या बसल्या होत्या. मात्र, करंजी (Karanji) गावाजवळ 11:30 च्या सुमारास बॅगेची चैन उघडी दिसली आणि राणी हार (22 ग्रॅम), मिनी गंठण (11 ग्रॅम), दोन ठुश्या (8.3 ग्रॅम), चार अंगठ्या (17 ग्रॅम), चैन (13.92 ग्रॅम), साखळी गंठण (35.99 ग्रॅम), नेकलेस (9 ग्रॅम) आणि पोत (15 ग्रॅम) असे एकूण 132.21 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला (Gold Jewelry Theft) गेल्याचे लक्षात आले. या दागिन्यांची बाजारभावानुसार किंमत सुमारे 13 लाख रुपये आहे.

YouTube video player

पाथर्डी बसस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे नसणे, प्रवाशांच्या सामानाची तपासणी न होणे आणि पोलिसांचा निष्क्रिय दृष्टिकोन यामुळे चोरट्यांचे फावले आहे. एस.टी. प्रवासादरम्यान चोरीच्या घटना आता नित्याच्या झाल्या असून, विशेषत: महिला चोरट्यांचा धुमाकूळ वाढला आहे. या घटनेनंतर पंचफुला जाधव यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात (Pathardi Police Station) गुन्हा दाखल केली असली, तरी ठोस कारवाईचा अभाव आणि तपासातील ढिसाळपणामुळे प्रवाशांमध्ये संताप आहे. वाढत्या चोर्‍यांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून अपेक्षित उपाययोजना होत नसल्याने नागरिक आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. बसस्थानकांवर सीसीटीव्ही यंत्रणा, नियमित गस्त आणि सामान तपासणी यासारख्या उपाययोजनांची मागणी जोर धरत आहे.

ताज्या बातम्या

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करा – विभागीय आयुक्त...

0
नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करीत पायाभूत सोयीसुविधांसह विकास कामांना गती द्यावी, असे निर्देश नाशिक...