Thursday, January 8, 2026
Homeनगरएसटीकडून दिवाळीसाठी 94 जादा गाड्यांचे नियोजन

एसटीकडून दिवाळीसाठी 94 जादा गाड्यांचे नियोजन

पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर मार्गावर अतिरिक्त बसेस

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

दिवाळीला सुरुवात झाली असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. एसटीच्या अहिल्यानगर विभागाकडून पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या लांब पल्ल्याच्या मार्गावर तसेच तालुक्यांसाठी 94 जादा फेर्‍यांचे नियोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

अहिल्यानगर एसटी विभागात 11 आगार असून, एसटी गाड्यांची संख्या 600 एवढी आहे. दरवर्षी एसटीकडून हंगामी 10 टक्के भाडेवाढ होत असते. परंतु यंदा महामंडळाने ही दरवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. सोमवारपासून (दि. 28) दिवाळीस सुरुवात झाली असून 3 नोव्हेंबरला भाऊबीज आहे. दिवाळीच्या कालावधीत मुंबई, पुणे व इतर मोठ्या शहरातील चाकरमानी गावी येत असतात. शिवाय महिलाही भाऊबीजसाठी पुढील 15 दिवस माहेरी जाण्यासाठी प्रवास करतात. त्यामुळे या काळात वाढणारी गर्दी लक्षात घेता एसटीने जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. सर्वच आगारांतून या जादा गाड्या सुटणार आहेत.

YouTube video player

यात सर्वाधिक गाड्या पुण्यासाठी आहेत. कारण, सर्वच ठिकाणांहून पुण्यासाठी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. त्यानंतर मुंबई, नाशिक, सोलापूर, बीड, छत्रपती संभाजीनगर या मार्गावरही प्रवासी वाढतात. त्यामुळे तेथेही जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय पाथर्डी, शेवगाव, जामखेड, संगमनेर, कोपरगाव, श्रीगोंदा अशा तालुक्यांच्या ठिकाणीही प्रत्येक आगाराने गाड्या वाढवल्या आहेत. महिला सन्मान योजनेंतर्गत महिलांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत दिली जात आहे. शिवाय ज्येष्ठ नागरिक व इतर योजनांचा लाभही प्रवाशांना घेता येणार आहे. पुणे-छत्रपती संभाजीनगर मार्गावर शिवशाही सेवा प्रकारातील अतिरिक्त फेर्‍या आरक्षणासाठी उपलब्ध केलेल्या आहेत. प्रवाशांनी या अतिरिक्त फेर्‍यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

नगरच्या स्वस्तिक बसस्थानकाचे काम पूर्ण
गेल्या महिनाभरापासून स्वस्तिक (पुणे) बसस्थानकाचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू होते. त्यामुळे प्रवाशांना अडचणी येत होत्या. परंतु हे काम पूर्ण झाले असून, आता प्रशस्त बसस्थानक प्रवाशांसाठी खुले झाले आहे. त्यामुळे गर्दीचे व्यवस्थापन करणे एसटी प्रशासनाला सोयीचे होणार आहे.

सटी महामंडळाच्या अहिल्यानगर विभागाकडून यंदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 94 जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी या अतिरिक्त फेर्‍यांचा लाभ घ्यावा.
– राजेंद्र जगताप, विभाग नियंत्रक, अहिल्यानगर

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : ‘वारसां’ना किती मिळणार मतदारांची ‘पसंती’?

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महानगरपालिका निवडणूक (Mahapalika Election) म्हटले की, केवळ पक्षीय राजकारण नव्हे, तर स्थानिक समीकरणे, आरक्षणाचे गणित आणि राजकीय वारसा यांचीही चर्चा...