Wednesday, September 9, 2026
Homeनाशिकआंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी; चार जणांचा मृत्यू; अनेक भाविक जखमी

आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी; चार जणांचा मृत्यू; अनेक भाविक जखमी

आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरातील वैकुंठद्वार दर्शन तिकीट केंद्राजवळ बुधवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत ४ भाविकांचा मृत्यू झाला तर अनेक भाविक जखमी झाल्याचे वृत्त आहे.

प्रत्यक्षात सकाळपासूनच तिरुपतीच्या विविध तिकीट केंद्रांवर हजारो भाविक वैकुंठद्वार दर्शन टोकनसाठी रांगेत उभे होते. वैकुंठ द्वार दर्शन दहा दिवसांसाठी खुले करण्यात आले असून, त्यामुळे टोकनसाठी हजारो नागरिकांनी गर्दी केल्याचे समजते.

- Advertisement -

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला व्यक्त शोक
तिरुपती येथील विष्णू निवासमजवळ तिरुमला श्रीवरी वैकुंठ गेटवर दर्शनासाठी टोकन घेण्यासाठी झालेल्या चेंगराचेंगरीत भाविकांचा मृत्यू झाल्याबद्दल मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी चंद्राबाबू नायडू यांनी जिल्हा आणि टीटीडी अधिकाऱ्यांशी बोलून सद्यस्थितीची माहिती घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून जखमींना चांगले उपचार मिळू शकतील.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप पुरस्काराने गौरव

0
मुंबई | वृत्तसंस्था जगभरातील नेत्यांच्या आवाजाने दुमदुमलेल्या ब्रिटनच्या संसदेतील वरिष्ठ सभागृह हाऊस ऑफ लॉर्डसमध्ये आज ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. निमित्त होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना...