Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजStampede News : आंध्र प्रदेशातील वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भाविकांचा मृत्यू,...

Stampede News : आंध्र प्रदेशातील वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भाविकांचा मृत्यू, अनेक जखमी

नवी दिल्ली | New Delhi

आंध्र प्रदेशातील काशीबुग्गा वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरीत (Andhra Pradesh Stampede) होऊन नऊ भाविकांचा मृत्यू (Death) झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहेत. तसेच घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कार्तिक महिन्यामुळे मंदिरात (Temple) मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले होते. भाविकांची गर्दी इतकी वाढली की, स्थानिक प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापन परिस्थिती नियंत्रित करू शकले नाही.त्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. यात आतापर्यंत ९ भाविकांचा मृत्यू (Death) झाला असून, अनेकजण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.

YouTube video player

दरम्यान, जिल्हा प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. तर प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की, सकाळपासूनच मंदिरात गर्दी लक्षणीयरीत्या वाढली होती आणि पुरेशा सुरक्षा व्यवस्थेअभावी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. याप्रकरणी स्थानिक प्रशासनाने अपघाताची चौकशीचे आदेश दिले असून, गर्दी नियंत्रणात कुठे चूक झाली हे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंकडून शोक व्यक्त

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (CM Chandrababu Naidu) यांनी वेंकटेश्वर मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरी आणि मृत्युंबद्दल दुःख व्यक्त केले आहे. एक्सवर पोस्ट करताना नायडू यांनी म्हटले की, “श्रीकाकुलम जिल्ह्यातील वेंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरीची हृदयद्रावक घटना घडली असून यात काही भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण जखमी झाले आहेत. सर्व पीडित आणि जखमींना त्वरित मदत करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आल्याचेही नायडू यांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्या