Friday, May 3, 2024
Homeनगर'बाळासाहेब देशपांडे'चे स्थलांतर करा

‘बाळासाहेब देशपांडे’चे स्थलांतर करा

अहमदनगर । प्रतिनिधी

वाढत्या रहदारीने होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे महापालिकेच्या मालकीच्या मध्यवस्तीत असलेल्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाचे स्थलांतर भोसले आखाड्यात करण्याची सूचना उपमहापौर गणेश भोसले व स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी केली. यासाठी १९ कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाल्याची माहिती त्यांनी दिली.

- Advertisement -

शहरातील रस्तेविकास व इमारतीचे नूतनीकरण याबाबत स्थायी समिती सभापती घुले यांनी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आशा टॉकीज चौकातील कै. बाळासाहेब देशपांडे दवाखान्याच्या स्थलांतराविषयी चर्चा झाली. या दवाखान्यासाठी सुमारे १९ कोटी निधी मंजूर असून आशा टॉकीज चौकामध्ये रहदारीचा मोठा प्रश्न निर्माण होत असल्याने देशपांडे दवाखाना भोसले आखाड्यातील प्रभाग क्रमांक चारमध्ये उभारण्यात यावे. त्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना उपमहापौर गणेश भोसले व स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी दिल्या.

यावेळी घुले म्हणाले की, आ. संग्राम जगताप यांनी काटवन खंडोबा रस्ता विकसित करण्यासाठी साडेआठ कोटी रुपयांची निधी शासनाकडून मंजूर करून आणला. याच बरोबर प्रभाग क्रमांक ११ मधील जुने सोलापूर रस्ता ते कानडे मळा महावितरण कार्यालय रस्त्यासाठी साडेनऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. प्रभाग क्रमांक १४ मध्ये महात्मा फुले चौक ते सारस पुल ते भांबरे दुकान संदीपनगर-वर्धमान अपार्टपर्यंत मजबुतीकरण व काँक्रिटीकरण कामासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर असून या कामातील अडथळे तातडीने दर करावेत.

यावेळी आयुक्त दूर शंकर गोरे, महिला बालकल्याण समितीचे उपसभापती मीनाताई चोपडा, माजी नगरसेवक निखिल वारे, संजय चोपडा, अजिंक्य बोरकर, उपायुक्त कुरे, अभियंता परिमल निकम, सुरेश इथापे, राम चारठाणकर, कल्याण बल्लाळ आदी पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

मंजूर रस्त्यांची कामे तातडीने सुरू करावी. रस्त्यांच्या मध्यभागी असलेले महावितरणचे पोल स्थलांतरित करण्यासाठी उपाय योजना कराव्यात. रस्त्यावरील अतिक्रमणे काढावी.

अविनाश घुले, सभापती, स्थायी समिती

- Advertisment -

ताज्या बातम्या