Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमहाविकास आघाडीच्या पहिल्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे….

महाविकास आघाडीच्या पहिल्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे….

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडत आहेत. अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे.

  • क्रीडा अनुदानात जिल्हा व तालुका स्तरावर कोटींची वाढ
  • महिला बचत गटातून 1000 कोटींची खरेदी करण्यात येईल
  • स्थानिकांना रोजगार मिळावेत यासाठी महा विकास आघाडी सरकार आग्रही, 80 टक्के नोकऱ्या स्थानिकांना मिळण्यासाठी कायदा करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.
  • महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या जुन्या बस बदलून त्याजागी 1600 नवीन बस खरेदी करण्यासाठी तसेच बसस्थानके आधुनिक करण्यासाठी 401 कोटींचा निधी देण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.
  • राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वतःचं कार्यालय असेल आणि त्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल असे अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादरीकरणात सांगितले.
  • शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सौर पंप बसवण्यात येणार आहेत यासाठी 6700 कोटींची तरतूद करण्यात आली आहे अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
  • कर्जमाफीसाठी एकूण 22 हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्याचं काम सुरू असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. यासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे न घालता मदत मिळेल अशी तरतूद करणार असल्याचेही पवार यांनी म्हंटले आहे.
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली असता त्यांनी रस्ते विकासासाठी जमीन भूसंपादित करा चार पदरी आणि आठ पदरी रस्त्यांच्या बांधणीसाठी 1200 कोटींची मदत केंद्रातून मिळेल असे आश्वासन देण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
  • शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सौर पंप बसवण्यात येणार आहेत यासाठी 6700 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. – अजित पवार
  • मतदारसंघातील कामासाठी 2 कोटीं ऐवजी 3 कोटी निधी आमदारांना देणार- अजित पवार
  • मुंबई मध्ये मराठी भाषा भवन, वडाळा येथे वस्तू व सेवा कर भवन उभारणार- अजित पवार
  • दररोज 1 लाख शिवभोजन थाळी देण्यासाठी 150 कोटींचा निधी- अजित पवार
  • महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या जुन्या बस बदलून त्याजागी 1600 नवीन बस खरेदी करण्यासाठी तसेच बसस्थानके आधुनिक करण्यासाठी 401 कोटींचा निधी देण्यात येणार – अजित पवार
  • सोलापूर व पुणे येथे नवे विमानतळ उभारणार – अजित पवार
  • कर्जमुक्ती शेतकरी
  • शेतकर्‍यांसाठी महाविकास आघाडीची घोषणा, 2 लाखापेक्षा अधिक कर्ज असणार्‍यांना दिलासा.
  • पायाभूत सुविधांची किंमत 2 लाख 48 हजार कोटी, शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याचा सरकारचा प्रयत्न
  • नागपूर जिल्ह्यामध्ये उर्जा पार्क उभारणार
  • वाहतूक व्यवस्था
  • कोकणचा विकास करण्यासाठी सरकारचं प्राधान्य,रस्त्यांचा विकास करण्यावर भर
  • पुण्यामध्ये मेट्रोचा विस्तार केला जाणार, स्वारगेट ते कात्रज पर्यंत होणार विस्तार तसेच वनाज-रामवाडी मेट्रो मार्गाचंही विस्तारीकरण
  • सोलापूर, पुणे शहरामध्ये नवं विमानतळ सुरू करणार
  • अत्याधुनिक मिनी बस, ग्रामीण भागात वायफाय युक्त बस येणार, 1600 नव्या बस दाखल होणार
  • 102 क्रमांकाच्या जुन्या रूग्णवाहिका बदलल्या जाणार
  • आरोग्य विभाग
  • ग्रामीण भागातील आरोग्य विभागासाठी 5 हजार कोटी
  • 20 डायलिसीस केंद्रे उभारणार, 996 प्रकारचे उपचार मोफत होणार, गुडघा पुर्नरोपणाचाही समावेश
    शिक्षण विभाग
  • सर्व शाळा आदर्श निर्माण करण्याचा मानस, सर्व शाळांना इंटनेटच्या जाळ्याने जोडणार
  • दहावी उत्तीर्ण व्यक्तींना रोजगार प्रशिक्षण, 21 ते 28 वर्ष वयोगटातील बेरोजगारांना सक्षम करणार, पाच वर्षात 10 लाख
  • बेरोजगारांना प्रशिक्षण
  • 21-28 वयोगटातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी विशेष योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. तर नवीन शिकाऊ उमेदवार योजना जाहीर
  • महिलांसाठी खास घोषणा
  • महिला सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध, प्रत्येक जिल्ह्यात एक महिला पोलिस ठाणे उभारणार
  • महिला आणि तरूणींना माफक दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून दिले जाणार
- Advertisment -

ताज्या बातम्या