Wednesday, October 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजअंगणवाडी सेविका, मदतनीसांची दिवाळी गोड होणार; सरकारकडून २ हजार रुपयांची घोषणा

अंगणवाडी सेविका, मदतनीसांची दिवाळी गोड होणार; सरकारकडून २ हजार रुपयांची घोषणा

मुंबई | Mumbai
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. या सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिवाळी बोनस जाहीर केला आहे. दिवाळीच्या निमित्ताने त्यांना दोन हजार रुपये दिले जाणार आहे.राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दिवाळीपूर्वीच शासनाकडून भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

राज्य सरकारकडून यंदाही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिवाळी भाऊबीज भेट दिली जाणार आहे. ही भेट दिवाळीपूर्वीच त्यांच्या बँकेतील खात्यांमध्ये जमा होणार आहे. राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दिवाळीपूर्वीच शासनाकडून भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

- Advertisement -

राज्यात 1,08,627 अंगणवाडी सेविका आणि 1,05,470 अंगणवाडी मदतनीस आहेत. त्यामुळे, दोन्हीची एकूण पदसंख्या 2,14,097 एवढी कार्यरत आहे. या सर्व कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रत्येकी दोन हजार रुपये भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. त्यासाठी 42 कोटी 81 लाख 94 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

जर्मनीहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग; ‘त्या’ कोडने उडवली यंत्रणांची झोप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील गर्भवती महिला, स्तनदा माता आणि बालकांच्या पोषणाची काळजी घेणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची दिवाळी गोड व्हावी, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Nashik Drought News : नाशिक जिल्ह्यातील ‘या’ तीन तालुक्यांचा दुष्काळी यादीत...

0
नाशिक | Nashik पाऊस वेळे आधीच माघारी परतल्याने राज्यात दुष्काळाची (Drought) परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळ...